शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले अन् ८ टन साहित्य केरळकडे रवाना झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:51 IST

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजळगावकरांचा मदतीचा हातआर्या फाउंडेशनने घेतला पुढाकारसोशल मिडीयाद्वारे केले होते मदतीचे आवाहन

जळगाव : केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाद्वारे केरळ पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी धनादेशद्वारे मदत पाठविली तर काहींनी जीवनावश्यक साहित्य दिले.या उपक्रमात सैन्यातील काही अधिकारी, जवान मदतीसाठी धावून आले असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वैयक्तिक मदत सोपविली आहे. शहिद जवानांच्या कुटुंबासाठी केलेले कार्य तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेवर सैन्यासोबत डॉ.धर्मेंद्र पाटील आणि सहकारी करीत असलेल्या आरोग्य सेवेमुळे सैन्यातील अधिकारी, जवानही पुढे सरसावले आहेत. यासोबतच प्रशाकीय अधिकारी यांनीदेखील मदतीचा हात दिला आहे. देणगीदार हे मुख्यत: जळगाव आणि नाशिक जिह्यातील आहेत.मदतीचे हे साहित्य नाशिक रेल्वे स्थानकावरून पाठविण्यात आले. फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक ऋषिकेश परमार यांनी बरेच साहित्य नाशिक येथून खरेदी केले. त्यासाठी जळगाव येथून संंस्थेने संबंधितांना धनादेश दिले.अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह सचिव डॉ.राहुल महाले, खजिनदार शलाका पाटील, डॉ.राहुल महाजन, डॉ.जितेंद्र मोरे, रवींद्र पाटील नाशिकचे समन्वयक ऋषिकेश परमार, अक्षय भावसार यांनी मदतनिधी, जीवनावश्यक साहित्य जमा करण्यासाठी प्रयत्न केलेत.

टॅग्स :JalgaonजळगावKerala Floodsकेरळ पूर