शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

महिनाभरानंतर पुन्हा व्यापाऱ्यांपुढे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 22:42 IST

आर्थिक घडी विस्कटणार

जळगाव : लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात होरपळून निघालेल्या व्यापारी बांधवांसमोर आता पुन्हा महिनाभरानंतर लॉकडाऊनमुळे संकट उभे राहिले आहे. विस्कटलेली आर्थिक घडी हळूहळू बसत असतानाच ७ जुलैपासून पुन्हा व्यवहार बंद होणार असल्याने व्यापाऱ्यांसह त्यांच्याकडे असलेला कर्मचारीवर्गही चिंतेत पडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून जीननावश्यक वस्तूंव्यतिरिक्त बंद असलेले इतर व्यवहार ५ जूनपासून सुरू झाले. मात्र आता पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमुळे ७ जुलैपासून ते बंद होत आहेत. यामुळे व्यापारी वर्गासमोर नवे संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा बसणे गरजेचे आहे, मात्र हे करीत असताना अर्थचक्रही फिरत राहणे गरजेचे असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.अनलॉकदरम्यान गर्दीवर नियंत्रण नाहीदेशभरात जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार जळगावातही टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरू होऊ लागले. यात व्यापारी वर्गाने आपापल्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझेशन, मास्कचा वापर या बाबी सक्तीच्या करीत ग्राहकांना सूचनाही दिल्या जाऊ लागल्या. मात्र हे होत असताना दुसरीकडे रस्त्यावर वेगवेगळ््या ठिकाणी भरणारा भाजी बाजार, विविध चौकात होणारे अतिक्रमण व त्यामुळे होणारी गर्दी यावर नियंत्रण मिळविण्यात पोलीस असो की महापालिकेची यंत्रणा यांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट होऊन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. रस्त्यांवरील गर्दीवर नियंत्रणच नसल्याने आता याची झळ नियमांचे पालन करणाºया व्यापाºयांनाही सहन करावी लागणार असल्याचे व्यापारी बांधवांचे म्हणणे आहे. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना आता पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आल्याने व्यवहार विस्कळीत होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.अर्थचक्राला पुन्हा ‘ब्रेक’कोरोनाचा सामना करताना शासनाला महसूल मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे अनलॉकला सरकारने प्राधान्य देत दक्षता घेऊन व्यवहार सुरू करण्याचे निर्देश दिले. व्यापार सुरू राहिला तरच राज्य सरकार असो की केंद्र सरकार, यांना जीएसटी व इतर करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे. मात्र व्यापारनगरी जळगावातील व्यवहार पुन्हा थांबवून एक प्रकारे अर्थचक्राचीच गती थांबविण्यात येत असल्याचे व्यापारी बांधवांनी सांगितले.केवळ दोन दिवसांची वेळ, मागविलेल्या मालाचे काय करणार?७ जुलैपासून करण्यात येणाºया लॉकडाऊनची घोषणा करताना केवळ दोन दिवसांची वेळ व्यापाºयांना मिळत आहे. यामध्ये बहुतांश व्यापाºयांनी माल मागविलेला असून हा माल आल्यानंतर आता तो कोठे उतरवावा, या बाबत स्पष्टता नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. एकतर वाहतूकदार माल आणायला तयार नसताना कसाबसा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला व मालाची टंचाई असताना तो उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले होते. मात्र आता पुन्ही ही घडीदेखील विस्कटणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे अडीच महिने बºयाच वस्तूंचे उत्पादन बंद होते, जो माल येणार आहे तो वेळेत विक्री झाला नाही व त्याची मुदत संपल्यास त्याची झळ कशी सहन करावी, असाही प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केला आहे.प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य, मात्र विश्वासात घ्याआता जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला व्यापारी वर्गाचे सहकार्य राहणारच आहे, मात्र लॉकडाऊनचा निर्णय घेताना व्यापारी बांधवांनाही विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते, असाही सूर उमटत आहे. अडीच महिने सरकार, प्रशासन यांच्या धोरणाचे पालनच केले गेले व आताही करणार आहे. मात्र यात व्यापाºयांकडे असलेल्या कर्मचाºयांनाही याचा फटका बसू शकतो. व्यवहारच बंद राहिले तर कर्मचाºयांनाही उत्पन्न नसताना किती दिवस व कशा प्रकारे पगार द्यावे, याचीही चिंता असतेच, असेही सांगण्यात येत आहे.जीवनावश्यक वस्तू ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेची बाब आहे. आता या लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंचेही व्यवहार बंद राहणार असल्याने रोजंदारीवर काम करून दररोज थोड्या-थोड्या वस्तू आणणºयांना त्याचा फटका बसू शकतो. त्यांच्यादृष्टीने हे योग्य नाही. या वस्तूंसाठी वेळ ठरवून देत ते सुरू ठेवणे आवश्यक आहे.- ललित बरडिया, सचि, जिल्हा व्यापारी महामंडळ.व्यवहार बंद करण्याच्या निर्णयाने पुन्हा आर्थिक प्रश्न उभे राहणार आहेत. प्रशासनाला व्यापाºयांचे सहकार्य राहणारच आहे, मात्र अनलॉकमध्ये दक्षता घेत गर्दीवर नियंत्रण मिळवित व्यवहार सुरू ठेवल्यास अर्थचक्रही फिरते राहू शकते.- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.दुकानांवरील कर्मचाºयांचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. उत्पन्नच नसल्यास कर्मचाºयांनाही पगार किती दिवस व कसा द्यावा, याची चिंता राहणार आहे. पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्व साखळी विस्कळीत होणार आहे.- अतुल वाणी, व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव