शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अन् प्रयास मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:25 IST

जळगाव - मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी नसताना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आग्रह धरून पोलीस प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी करून जमाव जमविल्यानंतर ...

जळगाव- मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी नसताना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आग्रह धरून पोलीस प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी करून जमाव जमविल्यानंतर गणेशमूर्ती महामार्गावरून थांबवून वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पिंप्राळा येथील प्रयास मित्र मंडळाच्या अध्यक्ष विकास चौधरी याच्यासह आठ ते दहा जणांविरू ध्द शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पिंप्राळा येथील प्रयास मित्र मंडळ बुधवारी रात्री गणेशमूर्तीसह महामार्गावरून विसर्जन मिरवणुकीत क्रमांक लावण्यासाठी जात होते़ परंतू, वाटेतच पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना थांबवून मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी आहे का? अशी विचारणा केली होती़ मात्र, परवानगी मिळाली नसल्याचे कारण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी होण्याबाबत पोलिसांना आग्रह धरला़ परंतू, परवानगी नसल्यामुळे पोलिसांकडून नकार देण्यात आला़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवकॉलनी स्टॉपजवळ गणेशमूर्ती थांबवून रस्त्यावरच ठिय्या मांडला व पोलीस प्रशासनाविरूध्द घोषणाबाजी करित जमाव जमविला़ याप्रसंगी रामानंद पोलीस ठाण्याती ल पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर, कांचन काळे, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, प्रमोद पाटील, रवींद्र पाटील, राकेश दुसाने, विनोद सोनवणे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजविण्याचे प्रयत्न केले़ परंतू, कार्यकर्त्यांकडून मूर्ती रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला व जमाव जमविला़ त्यामुळे अखेर शुक्रवारी पोलीस कॉन्सटेबर हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रयास मित्र मंडळाचा अध्यक्ष विकास चौधरी व त्याचा मित्र नितीन (पुर्ण नाव माहित नाही) व सोबत आठ ते दहा जण यांच्याविरूध्द भादवी कलम १४३, १४५, १४९, ३४१, २८३, १८८ तसेच पोलीस कायदा कलम ३३ (एन) चे उल्लंघन १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव