शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापतीच्या खून प्रकरणात आणखी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:45 IST

मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील (डी.ओ.पाटील) यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या कार्तिक टोपलिया उर्फ सुपडया जाधव(२४,दिग्वीजय मंडी, इंदूर,मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूर येथून अटक केली. गुन्हा घडल्याच्या दिवसापासून कार्तिक हा फरार होता. तो मध्य प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द तेथे सात गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्दे एलसीबीने इंदूर येथून घेतले ताब्यात: संशयित सराईत गुन्हेगार

जळगाव : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील (डी.ओ.पाटील) यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या कार्तिक टोपलिया उर्फ सुपडया जाधव(२४,दिग्वीजय मंडी, इंदूर,मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूर येथून अटक केली. गुन्हा घडल्याच्या दिवसापासून कार्तिक हा फरार होता. तो मध्य प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द तेथे सात गुन्हे दाखल आहेत.मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती यांचा १७ जून रोजी पहाटे कुºहा येथे पेट्रोल पंपावर झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्राने खून झाला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खून व आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी कुºहा ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्करराव पाटील(४९),विलास रामकृष्ण महाजन(५१),सैय्यद साबीर सैय्यद शफी (२९), सर्व रा.कुºहा, ता.मुक्ताईनगर, निलेश ईश्वर गुरचळ (३०) व अमोल मुरलीधर लंवगे (२७) रा.नाडगाव ता.बोदवड यांना अटक करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी नीलेश, अमोल व कार्तिक असे तिघं होते. नीलेश याने हल्ला केला होता तर दोघं जण बाहेर दुचाकीवर थांबून होते. यातील कार्तिक टोपलिया उर्फ सुपडया जाधव हा फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्वतंत्र पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व मुक्ताईनगरचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सहाय्यक फौजदार माधवराव पाटील,हवालदार रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, दादाभाऊ पाटील, अशोक पाटील तसेच विजय पाटील व नरेंद्र्र वारुळे यांच्या पथकावर ही जबाबदारी सोपविली होती. या पथकाने केलेल्या चौकशीत कार्तिक हा इंदूर शहरात असल्याची माहिती मिळताच या पथकाने बुधवारी तेथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. कार्तिक हा नीलेश याचा जवळचा मित्र आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव