शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:56 IST

अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे.

डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती.आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे. अर्थात आमदार पाटील यांनी पांझरा माळन नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक घेऊन त्यांच्या कामाची दिशात्मक चुणूक दाखवली आहे. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प१) निम्न तापी पाडळसरे प्रकल्प१९९८ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा प्रवास संघर्षमय आहे. युती सरकारच्या काळात याची सुरुवात झाली आहे. यास २०११ ला जलआयोगाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. २०१३ला पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र त्रुटी निघाल्याने २०१४ मध्ये त्रुटींची पूर्तता करण्यात आली. २०१८ मध्ये टीएसी कमिटीची मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी सर्वाधिक निधी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणला. त्यांनी सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सातत्याने दमदार पाठपुरावा केला. पाडळसरे प्रकल्पासाठी गुंतवणूक समितीची (आयसीसी) मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार त्यासाठीचा प्रस्तावही अद्याप सादर होणे बाकी आहे.२) नादुरुस्त व अपूर्ण उपसा सिंचन योजनापाडळसरे धरणातील पाणी साठ्याच्या वापरापासून परिसरातील शेतकरी वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना. बोहरा येथील साने गुरुजी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित असती तर मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ह्या योजनेचे थकीत वीजबिल टंचाई निधीतून माफ करून आणले होते. तसेच संस्थेवर बसलेले प्रशासकही हटविले होते. त्यांच्यानंतर मात्र या विषयास फारशी चालना मिळाली नाही. कृषिभूषण पाटील यांच्या काळात पाडळसरे धरणाचे जे काम झाले त्यामुळे या उपसा सिंचन योजनेच्या विहीरीजवळ मोठा व कायमस्वरूपी जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास फक्त राजकीय इच्छाशक्तीची आणि निधीची गरज आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील गावांच्या पिण्याचा पाण्याचीही समस्याही सुटेल.३) माळण पांझरा नदीजोड प्रकल्पतालुक्यातील पश्चिम भागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी माळन पांझरा नदीजोड प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी तालुक्यातील रणाईचे, खडके, निसर्डी, वाघोदे, चिमनपुरी, पिंपळे, ढेकु, गलवाडे या गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक तसेच मारवड विकास मंच, रणाईचे विकास मंच यांनी गावोगावी बैठका घेतल्या. शासनालाही जागे करण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रयत्न करून सर्वेक्षणासाठी २० लक्ष रुपये मंजूर करून आले होते. त्यामुळे सर्वेक्षणही झाले. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला अद्यापही त्याबाबतचे बिल मिळाले नसल्याचे समजते. अनिल पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवातच या प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन केली. त्यातून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची त्यांची मानसिकता सकारात्मक असल्याचे दिसते.४) धार मालपूर पाझर तलावासाठी जीवनदायी ठरणारा वळण बंधारापुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळण बंधाºयाच्या माध्यमातून धार मालपूर बंधाºयात टाकण्यात येईल. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहीरींना लाभ मिळेल. तसेच अनेक गावांचा पिण्याचा प्रश्न सुटेल. हा प्रकल्प ११ गावांच्या शेती सिंचनासाठी खूपच उपयुक्त आहे.५) सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प सुरू ठेवणेतालुक्यातील सिंचन प्रकल्पांना वीज पुरवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सोलर प्रकल्प उभारून सिंचन योजना सुरू करण्यात अशी अनेकांची दीर्घकालीन अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनिल पाटील यांनी या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा करणे. त्यासाठी भरीव निधी आणावा, ही जनतेची आग्रही अपेक्षा आहे.

टॅग्स :DamधरणAmalnerअमळनेर