जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी पाचोरा येथे नाराज शिवसैनिकांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेसाठी भाजपने शिवसेनेला दूरच ठेवले आहे. सोबत भाजपच्या मंत्री, पदाधिकाऱ्यांच्या शिवसैनिकांविषयीच्या वक्तव्याने शिवसेनेत नाराजी आहे. पाचोरा येथील पदाधिकाऱ्यांनी या पूर्वी बैठक घेऊन हे बोलून दाखविले होते. शिवसैनिकांची ही नाराजी पाहता जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारादरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोरा येथे शिवसैनिकांची भेट घेतली.
पाचोरा येथे नाराज शिवसैनिकांची घेतली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:50 IST