शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 19:37 IST

मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व एनए मान्यता रद्द करावे या विषयांसह कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाºयांच्या भूमिकेविरुद्ध नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

ठळक मुद्देकचरा व्यवस्थापनाबाबत घोळ यावरदेखील आणि सर्वसामान्यांची निव्वळ ई- टेंडरींगच्या फेºयात फिरणाºया व विविध विकास कामे रेंगाळलीअश्वारुढ पुतळ्याबाबत समिती तत्काळ स्थापन करण्याची मागणीविकासकाने मूलभूत सुविधा केल्या नसतील तर त्या एनए परवानग्या तत्काळ रद्द करण्यात याव्यात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व एनए मान्यता रद्द करावे या विषयांसह कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाºयांच्या भूमिकेविरुद्ध नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीकचरा व्यवस्थापनाबाबत घोळ यावरदेखील आणि सर्वसामान्यांची निव्वळ ई- टेंडरींगच्या फेºयात फिरणाºया व विविध विकास कामे रेंगाळत असल्याचे, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याबाबत तत्काळ समिती स्थापन करण्याची एकमुखी मागणी सभागृहात झाली, तर ज्या ठिकाणी पुतळा उभारण्याची घोषणा केली ती जागा अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने ही जागा वादातीत आहे. या जागेला ताब्यात घेण्याबाबत नगरपंचायतीने का कारवाई केली नाही, असा आक्षेप विरोधी बाकावरुन नगरसेवक संतोष मराठे यांनी घेतला, यावर मुख्याधिकाºयांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.एक वर्षापूर्वीपर्यंत दिलेल्या बांधकाम परवानगीत प्रत्यक्ष कामास सुरवात नसेल तर परवानगी रद्द करावी व एनए आॅर्डर दिल्यानंतर विकासकाने रस्ते गटारी वीज खांब या मूलभूत सुविधा केल्या नसतील तर त्या एनए परवानग्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात याव्या, अशी लेखी मागणी करण्यात आली. यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी अनुमोदन दिले. तसेच सभागृहात शहरातील गटारी दुरुस्ती व गटारीवरील ढापे बांधकामाचा मार्ग तत्काळ काढण्यात यावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरल्याने मुख्याधिकाºयांनी लवकरात लवकर सदर कामे करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना घरकुल व आदी कामांसाठी जुने भोगवटाधारकांना उतारे उपलब्ध करूनदेण्यात यावे जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीला वॉल कंपाउंडने संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली.सभागृहात मुख्याधिकारी श्याम गोसावी, बांधकाम उपअभियंता सावखेडकर, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, गटनेता पीयूष महाजन, शिवसेना गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक सविता भलभले, कुंदा पाटील, बिलकिस बी बागवान, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, मस्तान कुरेशी, संतोष मराठे, नीलेश शिरसाठ, शकील शेख, डॉ.प्रदीप पाटील, ललित महाजन आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षMuktainagarमुक्ताईनगर