शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बालकांना अपघात विमा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:43 IST

अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : राज्यातील १ लाख ९ हजार अंगणवाडीतील कोट्यवधी बालकांना अपघात विमा योजनेचा लाभ नाहीबालकांना अपघात विमा प्रश्नी शासनाकडून उदासिनता

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दि.१२ रोजी एका चारचाकी वाहनाने कासोद्यातील साईबाबा मंदिराजवळ एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाºया गरीब आदिवासी मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पण तिच्या दुर्दैवाने अंणवाडीत शिकत असणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत नसल्याची माहिती या घटनेनंतर मिळाल्याने ह्या अंगणवाडी विद्यार्थ्यांना पण अपघात विमा मिळाला पाहिजे, ही मागणी पालक वर्गातून पुढे आली आहे. यानंतर वरखेडी, ता.पाचोरा येथे १८ रोजी अंगणवाडीतील आणखी एका बालिकेचा अपघातात मृत्यू झाला.पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अशी काही दुर्घटना घडल्यास पीडित कुटुंंबाला त्वरित आधार दिला जातो. परंतु अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत.जळगाव जिल्ह्यातील ३६४० अंगणवाडीतून २ लाख ५० हजार विद्यार्थी सहा महिने ते ५ वर्षे वयोगटातून शिक्षण घेत आहेत, तर राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाडीत शिक्षण घेणºया कोट्यवधी बालकांना कुठलीही अपघात विमा लागू करण्यात आलेली नसल्याने पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सध्या प्रत्येक पालकाला एक किंवा दोनच अपत्य असतात. यापैकी एकावर जरी अपघातात आघात आला तर कुटुंब सैरभैर होते. हा आघात पचवणे जिकिरीचे होते. त्यातच मोलमजुरी करणाºया गरीब कुटुंबात अशी घटना घडली तर पूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. अशा कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात शासनाकडून पुढे आला पाहिजे, पण दुर्दैवाने या प्रश्नी आजपर्यंत उदासीनता दिसते आहे.अंगणवाडी बालकांना कुठल्याही अपघात विमा योजनेचे संरक्षण नाही. त्यामुळे कासोद्यातील अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेला कुठलाही लाभ देता येत नाही.-शीतल पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं.स., एरंडोलहा अतिशय गंभीर प्रश्न आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळवून देणेसाठी या अधिवेशनातच याप्रश्नी लक्ष वेधले जाईल.-आ.चिमणराव पाटील, एरंडोलइयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा मिळतो. तसा अंगणवाडीतील बालकांनादेखील असेच संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करणार आहे.-उज्वला पाटील, अध्यक्षा, जि.प., जळगावगेली आठ वर्षे मी जिल्हा परिषदेत काम करीत आहे. पण आजतागायत अंगणवाडीतील एकाही बालकाला अपघात विम्याचा लाभ मिळाला किंवा तशी घटना घडली, अशी माहिती नाही.-रफिक तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव

टॅग्स :SchoolशाळाErandolएरंडोल