शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

और तब बोला तबला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:58 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘शास्त्रीय वाद्यसंगीत आणि रजतपट’ या सदरात जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त उद्घोषिका डॉ.उषा शर्मा लिहिताहेत उस्ताद जाकीर हुसेन यांच्याविषयी...

‘बदरा घिर आए, ऋत है भीगी-भीगी’ या गीतातील त्याचप्रमाणे ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या अप्रतिम गीतातील तबला स्वस्थ बसू देई ना! बहिण म्हणाली, तुला ‘सामान्यज्ञानावर’ प्रश्नपत्रिका सोडवायची आहे का..., तिनं गीत, संगीताचा आनंद घेतला आणि मी शोधत राहिले हे उस्ताद अल्ला राखा, उस्ताद अहमद जान थिरकवा, पंडित सामता प्रसाद, पंडित किशन महाराज की पंडित आलोकनाथ मिश्रा? ... तिनं पुन्हा छेडलं, ‘तुला समजते सगळ्यांची शैली? फरक समजतो?’ मी म्हटलं, त्यातलं क, ख, ग, माहीत नाही पण ऐकल्यानंतर त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि अलाहिदा आनंद प्राप्ती होते...तबल्याचा इतिहास जाणून घेण्याची आवश्यकता नाही, पण हजारो वर्षापूर्वी ज्यांनी लेण्यांमध्ये मृदंग... डमरू सारखी वाद्यं कोरलीत, त्यांना सलाम करावा... एरवी अमीर खुसरो यांना तबल्याचा जनक मानतात. तब्ल- म्हणजे वाद्य, पखवाजचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली, असाही उल्लेख आढळतो... म्हणून म्हटलं जातं.---तोडा और तब बोला तबला...आपल्या अब्बाजानसारखा हादेखील तबलावादक बनू नये म्हणून अम्मीजान तबले लपवून ठेवत असे, पण सहा-सात वर्षांचा जाकिर ताट-वाट्या आणि चमचे घेऊन तबला वादनाचा आनंद घेत असे. अब्बाजान जागतिक पातळीवरचे कलाकार तसाच हा लेक पण. त्यांनी चित्रपटांना संगीत दिलं तर हा कुठं मागे राहणार? पूर्व-पश्चिम कलांचा संगम-दाक्षिणात्य आणि हिंदस्थानी तालवाद्यांची जुगलबंदी हिट अ‍ॅण्ड डस्ट, विएतनाम, अ टेलिविजन हिस्टरी, साज, मंटो, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर, वनप्रश्थम.. अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.उस्ताद अल्ला राखा म्हणजे उस्ताद जाकिर हुसैन ह्यांचे अब्बूजान ए.आर.कुरेशी या नावानं चित्रपटांना संगीत देत. साधारण साठचं दशक असावं. बेवफा, आलमआरा, यादगार (१९४७), खानदान (१९५५), हातिमताई की बेटी, परवीन... असे अनेक! सकाळी ७.३० ते ८.०० या दरम्यान रेडिओ सिलोनवर त्यांची मी अनेक गाणी ऐकली अन् त्यांचा नवा परिचय मिळाला. ‘मेरी सूरत तेरी आँखे’ या चित्रपटात पं.समताप्रसाद आणि उ.अल्ला राखा यांचा विलोभनीय तबला बर्मनदा यांनी सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘पिया तोसे नैना लागे रे’ (चित्रपट- गाईड) या गीतात पंडित शिवकुमार शर्मा यांचा तबला असल्याचा उल्लेख आहे. पं.शर्मा हे संतुरवादक म्हणून सर्व परिचित आहेत. पण आरंभिक काळात ते तबला वादनात रस घ्यायचे असं म्हणतात.पद्मश्री, पद्मभूषण उस्ताद जाकिर हुसैन यांना मागे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं! त्यांची तन्मयता आणि समर्पितता पाहिली. तबला वाजवता-वाजवता मध्येच विनोद पेरणं, कृष्ण राधेचा संवाद, दोन मित्रांमधला संवाद पेरणं इतकं सहज होतं की फक्त सलाम करावा त्यांच्या जादुई हाताला आणि म्हणावं ‘वाह उस्ताद’.‘साज’ (१९९८) हा चित्रपट पद्मभूषण सई परांजपे यांच्यामुळे जितका लक्षात राहतो तितकाच या चित्रपटाचे प्रमुख संगीत निर्देशक उस्ताद जाकिर हुसैन यांच्या पार्श्वसंगीतामुळे (कथानकाची मागणी म्हणून इतर तीन संगीतकारही होते) लक्षात राहतं ‘फिर भोर भई जागा मधुबन’ हे अप्रतिम चाल असलेलं गीत. गीतकार जावेद अख्तर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार लाभलेला. दोन सख्ख्या बहिणी मानसी आणि बंसी दोघी गायिका परंतु व्यावसायिक कला पातळीवर त्यांची भूमिका कशी टोकाची हे दर्शविणारा चित्रपट ‘साज’! यात उस्ताद जाकीर हुसैन यांनी संगीता समवेत भूमिकाही वठवलेली...‘साज’ चित्रपटानंतर उस्ताद जाकीर हुसैन यांनी नंदीता दास यांच्या ‘मंटो’ या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिल्याची नोंद आहे. १९९६ च्या अटलांटा आॅलिंपिक्सच्या उद्घाटन सोहळ्यासाठीची त्यांची वाद्यवृंद रचना श्रोत्यांच्या स्मरणात आहेच! सोलो, फ्यूजन, गायक-वादकांसमवेत तन्मयतेनं साथसंगत करणारा हा कलाकार स्वत:ची शैली जपणारा म्हणून कलाजगतात मान्यताप्राप्त आहे.साता समुद्रापलिकडे भारतीय संगीताचा पताका फडकविणाऱ्या या कलाकारास मानाचा मुजरा !-डॉ.उषा शर्मा, जळगाव

टॅग्स :musicसंगीतJalgaonजळगाव