शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या क्रीडाक्षेत्रात पुरस्काराने आनंदलहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:34 IST

क्रीडा समन्वयक ते गुणवंत क्रीडा संघटक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १३ - राज्य शासनाने गेल्या तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सोमवारी घोषणा केली. त्यात जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संघटक फारूक शेख अब्दुल्ला यांना सन २०१४-१५ साठी तर डॉ.प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांना २०१६-१७ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) नाशिक विभागातून जाहीर झाला आहे.क्रीडा समन्वयक ते गुणवंत क्रीडा संघटकजैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक असलेले फारूक़ शेख यांचा हा सलग तिसरा शासकीय पुरस्कार आहे. त्यांना २०१५च्या जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि २०१६च्या जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.जिल्हास्तरावर ९२, विभागीय ८, राज्यस्तरीय १२, राष्टÑीय स्तर आठ आणि दोन आंतरराष्टÑीय स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी हॉकी व फुटबॉलमध्ये नाव कमावले. जळगाव जिल्हा फुटबॉल असो.च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते महाराष्टÑ बुध्दिबळ संघटनेचे सचिव, राज्य अम्यच्युअर अ‍ॅक्वेटीक असो.चे सहसचिव आणि हॉकी, इनडोअर हॉकी, बॉडी बिल्डर असो या राज्य संघटनांचे उपाध्यक्ष आहेत. जिल्हा स्तरावर हॉकी, फुटबॉल, महिला हॉकी, मास्टर टेबल टेनिस, जलतरण, पॅराआॅलिम्पिक, इनडोअर हॉकी, स्क्वॅश, बिलियर्डस्, स्रुकर, आदी जिल्हा संघटनांचे सचिवपद तर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्षपद, टेबल टेनिस व क्रिकेट संघटनेचे संचालकपद भूषवित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचे हॉकी व फुटबॉलमध्ये आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्टÑ चेस लीग, चेस इन स्कुल या उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.क्रीडा शिक्षक ते गुणवंत क्रीडा संघटकशिक्षण प्रसारक मंडळाच्या ला.ना.सार्वजिनक विद्यालयात क्रीडाशिक्षक असलेले डॉ. तळवेलकर हे बीपीएड, एम फिल पदवीधारक असून निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत. राज्य शासनाने अलीकडेच त्यांची क्रीडा तज्ज्ञांच्या समितीवर नेमणूक केली आहे. भारतीय सॉफ्टबॉल असो.चे सहसचिव, राज्य सॉफ्टबॉल असो.चे सचिव, राज्य बॉल बॅडमिंटन असो.चे ते सचिव आहेत. याशिवाय क्रीडा भारती, सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, सेपाक टकारा, थ्रो बॉल, वूड बॉल, माँटेक्सबॉल या संघटनांचे ते जिल्हा सचिव आहेत. तलवारबाजी व आट्यापाट्या जिल्हा संघटनांच्या खजिनदारपदीही ते आहेत. आपल्या उमेदीच्या काळात उत्तम कबड्डीपटू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी ज्युनियर गटात राष्टÑीय कबडडी आणि दोन वेळा अ.भा.आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा खेळली आहे.यापूर्वी त्यांना जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उत्कृष्ट प्रशिक्षक व सर्वोत्तम क्रीडा संघटक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आशियाई ज्युनियर सॉफ्टबॉल स्पर्धा (२००० व २०१०) या आंतरराष्टÑीय स्पर्धेच्या आयोजनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.हा पुरस्कार माझा नाही तर जळगावकरांचा आहे. सलग तिसºया वर्षी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. शिवाय शासकीय पुरस्कारांची हॅटट्रीक राज्य पुरस्काराने पूर्ण झाल्याचा अत्यानंद आहे. २०१६ मध्ये जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलालजी जैन यांनी आपल्याला जिल्हा पुरस्कारांवर थांबायचे नाही, राज्य पुरस्कारांजोगे काम करायचे आहे असे प्रोत्साहन दिले होते त्यांचे शब्द आज आठवतात.-फारूक शेख अब्दुल्लाशिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा संघटकक्रीडा क्षेत्रात काम केल्यानंतर पालक, खेळाडू व सहकारी क्रीडा संघटकांकडून आपल्या कामगिरीची दखल घेतली गेलेली होतीच, परंतु आता शासन दरबारीसुद्धा अधिकृतरित्या दखल घेण्यात आल्याने साहजिकच आनंद झाला. गेल्या २५ ते ३० वर्षातील मेहनतीचे चीज झाले. या काळात सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, तलवारबाजी, बेसबॉल, आट्या पाट्या अशा प्रवाहाबाहेरच्या खेळांच्या प्रचार-प्रसारासाठी झटलो.- डॉ. प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा संघटक

टॅग्स :JalgaonजळगावSportsक्रीडा