जळगाव : घरात झोपलेल्या लोकांच्या अंगावर गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी ५० हजाराच्यावर रोख रक्कम व दागिने असा सुमारे दिड लाखाचा लांबविल्याची घटना कानळदा रस्त्यावरील भगवती नगरात घडली. दीपक जगन्नाथ परदेशी (गुप्ता), हेमंत परदेशी व अनिल परदेशी या तिन्ही भावांकडे ही घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातील बॅग, पेट्या व कपडे शेजारील शेतात फेकले आहेत.कानळदा रस्त्यावर राजाराम नगरानजीक असलेल्या भगवती नगरात दीपक जगन्नाथ परदेशी (गुप्ता), अनिल जगन्नाथ परदेशी व हेमंत जगन्नाथ परदेशी हे तीन भाऊ पत्र्याच्या घरात राहतात. तिघांचा परिवार एकत्रच आहे. शेजारीच शेत आहे. दीपक यांच्या खोलीत आई प्रभा या एकट्या झोपल्या होत्या. त्या खोलीतील कपाट फोडून ३० हजार रुपये रोख, दोन तोळ्याची सोन्याची साखळी व ५ ग्रॅमची अंगठी चोरट्यांनी लांबविली. तर हेमंत यांच्या खोलीतून २० हजार रुपये रोख, ५ ग्रॅम सोन्याचे दोन पेंडल असा ऐवज लांबविला. ज्या खोलीतून या वस्तू चोरल्या तेथेच हेमंत व त्यांची पत्नी झोपलेले होते तर पुढच्या खोलीत मुले झोपलेले होते.
जळगावात गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी लांबविली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:24 IST
जळगाव : घरात झोपलेल्या लोकांच्या अंगावर गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी ५० हजाराच्यावर रोख रक्कम व दागिने असा सुमारे दिड लाखाचा लांबविल्याची घटना कानळदा रस्त्यावरील भगवती नगरात घडली. दीपक जगन्नाथ परदेशी (गुप्ता), हेमंत परदेशी व अनिल परदेशी या तिन्ही भावांकडे ही घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातील बॅग, पेट्या व कपडे शेजारील ...
जळगावात गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी लांबविली रक्कम
ठळक मुद्देकानळदा रस्त्यावरील भगवती नगरात घरफोडीशेतात फेकल्या पेट्या व कपडेपेन्शनच्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला