शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 16:33 IST

विधवा महिला हळदीच्या कार्यक्रमास गेलेली असताना चोरट्याने चोरी केली.

अमळनेर : घराच्या मागील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून विधवा महिलेच्या घरातील आठ लाखाचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २८ रोजी रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान घडली.रेखा अनिल लांडगे ही महिला २८ रोजी रात्री ९ वाजता घराला कुलूप लावून आपल्या मुलांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास ती परत आल्यावर तिने घराचा दरवाजा उघडला असता तिला घरामागील दरवाजा तुटलेला दिसून आला. तिने घरातील कपाट पाहिल्यावर त्याचे लॉकरही तोडलेले दिसून आले. कपाटातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्यांचे तीन सोन्याचे नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे तीन सोन्याचे काप, २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्राम वजनाचे सोन्याचे टोंगल, ८० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले किल्लू व बाळ्या, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे पेंडल व मणी, ७ हजार ५०० रुपये वजनाचे १५ भार वजनाचे चांदीचे पैंजण, ५ हजार रुपयांचा १० भार चांदीचा कंबरेचा पट्टा व कपाटातील २ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे.घटनास्थळी डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाययक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, दीपक माळी, रवी पाटील यांनी भेट दिली तर श्वानपथक व अंगुली मुद्रापथक पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाचे विनोद चव्हाण यांनी श्वानाला वस्तूंचा गंध दिला तर अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. कांबळे, साहेबराव चौधरी यांनी विविध वस्तू व कपाटावरील ठसे घेतले.रेखा लांडगे यांचे पती ५ महिन्यांपूर्वीच मयत झाले आहेत. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने श्रावण श्याम संदानशीव व बंटी उर्फ विशाल नाना बिऱ्हाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर