शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:41 IST

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे  जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम ...

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे 

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सुरूच असून वेळेवर आलेल्या या या पावसामुळे कपाशीसह उडीद, मूग व इतर पिकांना फायदा झाला आहे. मात्र आता आणखी हा भिज पाऊस असाच सुरू राहिला तर बुरशी लागण्याचीही भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.  या पावसामुळे धरण साठ्यातही वाढ होत असून गिरणा धरणाची पाणी पातळी ५२ टक्क्यांच्या पुढे गेली असून हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे १४ दरवाजे अजूनही उघडेच आहेत. दुसरीकडे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणात पावासाच्या सरी सुरूच असून रविवारीदेखील दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागन झाले. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून सलग पाऊस   सुरूच आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे पिके तरारत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र आता हा पाऊस आणखी काही दिवस सुरूच राहिला तर कपाशीसह, उडीद, मूग व इतर पिकांनाही बुरशी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गिरणा धरणाच्या साठ्यात वाढगिरणा धरणाच्या पाणी साठ्यात या पावसामुळे वाढ होऊन धरण साठा  ५२ टक्क्यांच्यापुढे गेला आहे. धरणात ५२.१ टक्के पाणीसाठा झाला असून वाघूर धरणात ८७.४२ तर हतनूर धरणात १८.९० टक्के पाणीसाठी झाला आहे. हतनूर १४ दरवाजे उघडेचहतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे अजूनही पूर्ण उघडचेच आहे. धरणात येणाºया पाण्याचा वेग पाहता १४ आॅगस्ट रोजी धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने दरवाजे बंद करण्यात आले. यात रविवारी  १४ दरवाजे पूर्ण उघडे होते. त्यामुळे धरणातून ३१ हजार २२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची आवक सुरूच आहे.    पांझरा पात्रात वाढणार विसर्ग पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेल्या  मालनगाव मध्यम  प्रकल्प (ता. साक्री) व जामखेडी मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे १६१०  व ४१९  क्युसेक्स वेगाने विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे रविवारी सकाळी ९ वाजता दोन दरवाजे अर्धामीटरने  उघडण्यात आले असून  २०८० क्युसेक्स विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव