अमळनेर, जि.जळगाव : शहरातील न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवल एका व्यापाºयावर अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून हातातील पिशवी लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३ रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली. गोळीबार केल्यानंतर चोरटे पसार झाले.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर बितराई यांचे भाऊ बसंतालाल बितराई कैलास ट्रेडिंगचे मालक हे त्यांचा मुलगा अजय याच्यासोबत दुकान बंद करून घरी परतले. ते घराजवळ पोहचले असता सेंट्रल बँकेकडून दोन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी दोघांच्या हातातून खाली थैली व जेवणाचा डबा हिसकावण्याचा प्रयत्न करीत असताना गोळीबार केला. सुदैवाने गोळी दोघांच्या मधून जाऊन भिंतीला लागली आणि रिकामी पुगळी अवघ्या १५ फुटांवर रस्त्यावर जाऊन पडली.घटनेचे वृत्त कळताच अर्बन बँकेचे चेअरमन भरत ललवाणी घटनास्थळी पोहचून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी केली.चार वर्षांपूर्वीही याच ठिकाणी या व्यापाºयाला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.
अमळनेरात व्यापाऱ्यावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:10 IST
न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवल एका व्यापाºयावर अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून हातातील पिशवी लुटण्याचा प्रयत्न केला.
अमळनेरात व्यापाऱ्यावर गोळीबार
ठळक मुद्देबॅग लुटण्याचा प्रयत्नगोळीबार केल्यानंतर चोरटे पसार