शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर साने गुरुजी शिक्षक पतपेढी नोकर भरती प्रकरणी 'जैसे थे'चे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:41 IST

साने गुरुजी शिक्षक पतपेढी नोकर भरती प्रकरणी 'जैसे थे'चे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या नोकर भरतीबाबत सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एस. शेख यांनी १७ डिसेंबरपर्यंत 'जैसे थे'चे आदेश दिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे.दीपक रामकृष्ण पाटील हे अमळनेर सानेगुरुजी पतपेढीत कर्मचारी होते. त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवून त्यांना परस्पर कामावरून कमी करण्यात आले होते. त्या दरम्यान पतपेढीला कर्मचारी सूची मंजूर झाली असून, नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र दीपक पाटील यांच्या नावावर तत्कालीन संचालक मंडळाने बनावट कर्ज दाखवले. तसेच कोणताही गैरव्यवहार केल्याचे लेखा परीक्षणात आढळून आले नाही. तसेच अपहाराबाबत दीपक पाटील यांच्याविरुद्ध पोलिसातदेखील तक्रार नाही. उलट पक्षी तत्कालीन संचालक मंडळाने अपहार केला असून, ते दडपण्यासाठी खोटा आरोप लावून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. कर्मचारी भरतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, असा दावा त्यांनी ऍड.उमेश पवार यांच्यामार्फत सहकार न्यायालयात दाखल केला असता न्यायालयाने पतपेढीला ११ रोजी आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. पतपेढीतर्फे रवींद्र दगडू पाटील यांनी मुदतवाढीसाठी अर्ज दिला असता न्यायालयाने १७ डिसेंबर ही सुनावणीची तारीख ठेवली आहे. तोपर्यंत 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAmalnerअमळनेर