शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अमळनेरला रंगला राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 20:17 IST

पाणीप्रश्न: आजी व माजी आमदारांमध्ये ‘चकमक’

अमळनेर : अक्षय तृतीयेला बोरी नदी पात्रात सकाळी पाण्याच्या प्रश्नावरून आजी व माजी आमदारांच्या गटात प्रसाद महाराजांच्या समोरच राजकीय आखाडा रंगल्याने पुन्हा एकदा राजकारण्यांमध्ये मारामारी होती का? अशी भीतीही यावेळी निर्माण झाली होती. मात्र भाविकांची चांगलीच करमणूक होऊन चर्चेस उधाण आले होते.दरवर्षी अक्षय्य तृतीयेला समाधी मंदिरासमोर एैलाड व पैलाड मधील महिला एकमेकांना शिव्या देण्याची परंपरा आहे. यंदा मात्र संत सखाराम महाराज यात्रोत्सावाचा ध्वजारोहण व स्तंभारोपण या धार्मिक कार्यक्रमात राजकीय चर्चेतून झालेल्या आजी माजी आमदारांमधील शाब्दिक वादामूळे आखाजीचा आखाडा सायंकाळ ऐवजी सकाळीच रंगलाअन्नपूर्णा खांबांची पूजा होत असताना प्रसाद महाराजांसमोर सर्व अधिकारी राजकीय नेते बसलेले असताना प्रसाद महाराजांनी सर्वांसमक्ष सांगितले की, सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवात साहेबराव पाटलांनी पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती आणि त्याच क्षणाला हा सूर पकडून त्यांनी शेजारीच बसलेल्या आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे कटाक्ष टाकून लोकमतच्या बातमीचा संदर्भ देत म्हटले की, याना सांगा हे टीका करतात. त्याचवेळी शिरीष चौधरी म्हणाले की, आता अमळनेरच्या जनतेला व्यवस्थित पाणी पुरवठा करा. तेव्हा साहेबराव म्हणाले की, पाडळसरे धरणाला निधि आणायची बोंब पडली नाही ते कोणामूळे बंद पडले ते पहा... ते आमदारांचे काम होते. त्यावर आमदार शिरिष चौधरी म्हणाले की, आता तूम्ही जे कलाली डोहातून पाणी घेवून शहराला पूरवठा करतात त्या तात्पूरत्या कलाली पाणी योजनेला तूम्हीच विरोध केला होता.यावेळी पाणी प्रश्नावर दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. पुन्हा शिरीष चौधरी गटाचे गटाचे विरोधीपक्ष नेते प्रवीण पाठक (ज्यांनी नगराध्यक्षसह नगरसेवक अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला आहे ) म्हणाले की, आता तूम्ही जवढे दिवस आहात तेवढे दिवस तरी शहराला पूरेसा पाणी पूरवठा करा. हा टोमणा मारल्याने साहेबराव पाटील चांगलेच चिडल. तू कोण माझी मुदत ठरवणारा... असे म्हणत मध्ये बोलू नको चांगल्या कामासाठी आलोय आणि तशी इच्छा असेल तर हा कार्यक्रम सोडा आणि या मग बाजूला नदी पात्रात असे आव्हानच साहेबराव पाटील यांंी उठून दिले. दोघांमधील शाब्दिक चकमक वाढत चालली असताना धार्मिक कार्यक्रमाचा राजकीय आखाडा होऊन पुन्हा एकदा शहराची बदनामी होऊ नये म्हणून प्रसाद महाराजांनी दोघांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी प्रवीण पाठक यांनी गमतीचा विषय सुरू असून साहेबराव दादानी मनाला लावून घेतल्याचे कबुल केले. यावर साहेबराव पाटील म्हणाले की, मी आणि आमदार चर्चा करत असताना माझ्या गटातील कोणीच बोलत नाही, तू बोलू नको, आमदार बोलतील असे सांगितले. त्यांनतर काही चाणाक्ष उपस्थितांनी ‘बोला सखाराम महाराज की जय’ च्या घोषणा देऊन विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला नंतर अनिल भाईदास पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन हे सपाट पायाचे सरकार आहे ना म्हणून असे होतेय ना ? असे म्हणत साहेबराव पाटलांना चिमटा काढला. तेव्हा शिरीष चौधरी यांनी मी आधी पासून सहयोगी आहे. साहेबराव पाटील नंतर का आले भाजपात असे ते म्हणाले आणि पुन्हा चर्चा रंगली. पुन्हा महाराजांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर साहेबरावानी शांतता घेत वाद सुरू राहतात आम्ही सर्व एकत्र आहोत, असे म्हणत शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकला नंतर प्रसाद महाराजांसह सर्व स्तंभरोपण साठी समाधी मंदिरासमोरील मंडपात आले. त्या ठिकाणी राजकिय कट्टर वैरी भाजपा जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील शेजारी शेजारी बसले. त्यावर शाब्दिक कोटी करीत ऊदय वाघ माझे डावे तर माजी आमदार साहेबराव पाटील ऊजवे असल्याचे सांगून पून्हा धार्मिक कार्यात राजकीय चचेर्ला तोंड फोडले. परत अधून मधून राजकिय चर्चा होत असतांना संत सखारामांचा जयघोष करीत विषय टाळण्यात आला. नंतर साहेबराव पाटील यांनी प्रवीण पाठक यांच्या तोंडात बत्तीसा देऊन गोड वातावरण करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय वाद शमल.े एकंदरीत या धार्मिक आखाड्यात शहराच्या पाणी प्रश्नावर राजकिय चर्चा रंगल्यामूळे आखाजीला सांयंकाळी नदी पात्रातील महिलांच्या प्रेम व मित्रत्वाच्या भावनेत शाब्दिक चकामक पाहण्याप्रमाणे आंनद राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सकाळीच भाविकांना बघायला मिळाला.वादातील चचेर्नंतर साहेबराव पाटलांनी आमदार शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांचं खांद्यावर हात टाकून आमच्यात वाद नाहीत असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजारी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील व मागे भगवा शर्ट घातलेले प्रवीण पाठकछाया अंबिका फोटो