शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरचे झाले ‘बिका’नेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:17 IST

उमेदवार बाहेरचे : हाणामारीच्या घटनांचीही परंपरा

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमि , साने गुरुजींची कर्मभूमि , श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमि आणि कधीकाळी क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या अमळनेर शहराला काही दिवसांपूर्वी लागलेल्या ‘बिका’नेर या विशेषणानंतर नुकत्याच भाजप अंतर्गत झालेल्या राडयामुळे राजकीय नेत्यांची रणभूमी असे नवीन विशेषण लागले असून पुन्हा एकदा अमळनेर शहर राज्यात चर्चेत आले आहे.कधीकाळी अमळनेरहून लंडनला जाणाऱ्या प्रताप मिलच्या सुती कपड्यामुळे म्हणा किंवा पटेल जर्दा असो किंवा प्रताप तत्वज्ञान केंद्र असो की जगप्रसिद्ध विप्रो कंपनीच्या ‘मदर युनिट’ मुळे किंवा अलीकडेच २० वर्षांपासून नावारूपाला आलेले मंगळदेव ग्रह मंदिर असो अमळनेरचे नाव नेहमी चर्चेत आणि अग्रेसर राहिले आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते व घडामोडींमुळे ही अग्रेसरच राहिले आहे.राजकीय क्षेत्र सतत चर्चेतखान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली ती तत्कालीन जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यामुळे! अमळनेर म्हणजे आक्रमकता हे विशेषणही लागले. मुलाला शिवीगाळ केली म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडा यांनी नवले नावाच्या पोलीस अधिकाºयाला पोलीस स्टेशनमध्येच खाली फेकले होते. त्याच गोविंद मुंदडा यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या वादातून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर हात उचलला होता. ही राजकीय मारामारी चांगलीच रंगली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदार आणले म्हणून अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात केलेली तक्रार व वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला.उमेदवार लादलेलेविधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक वर्षात उमेदवार बाहेरचेच विजयी झाले आहेत. १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने डॉ. बी.एस. पाटील यांना उमेदवारी दिली. ते बाहेरचे म्हणून चर्चाही झाली मात्र त्याचा फारसा परिणाम न होता ते विजयी झाले. ते तीन पंचवार्षिकमध्ये आमदार होते. त्यानंतर साहेबराव पाटील हे आमदार झाले. तेदेखील मुळचे पारोळा तालुक्यातील राजवड येथील. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. पैसा खर्च करा व निवडून या असेच या मतदार संघाबाबत झाले असून ‘अमळनेरचे ‘बिका’नेर झाले असे विशेषण लावले जात आहे.हाणामारीची परंपरानगरपालिका निवडणुकीत अनिल भाईदास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात झालेल्या मारामारीने आणि दंगलीमुळे तोडफोड नुकसान होऊन राजकीय नेत्यांनी अमळनेर ला चर्चेत आणले. कार्यकर्त्यांमध्ये गलिच्छ राजकारणाची नशा चढली. अनेक दिवस तणावपूर्वक वातावरण होते. त्यादरम्यान अनिल भाईदास पाटील व माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यातील वैमनस्य, उदय वाघ व अनिल भाईदास पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष, तसेच वाघ व बी. एस. पाटील यांच्यातील संघर्ष भाजप च्या विधानसभा व पालिका पराभवाला कारणीभूत ठरला.

टॅग्स :Politicsराजकारण