शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

सदा असावे हसतमुख

By admin | Updated: April 30, 2017 16:34 IST

वीकेण्ड या सदरात पत्र या विषयावर जयंत पाटील यांनी केलेले लिखाण

प्रिय केतू, सप्रेम आठवण
तुला हे पत्र बºयाच मोठ्या अवकाशानंतर लिहितोय, याची जाणीव आहे. केतू, आमचा भूषण नावाचा १८-१९ वर्षांचा नातू जो नाट्यक्षेत्रात रमला होता. तो हे जग मागील वर्षी सोडून गेला. त्याच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आसोदे (आपले मूळ गाव. जळगावपासून ५ कि.मीटरवर आहे. तिथे आपले घर अजून आहे.) येथून माझ्या सुना-वहिन्या-भाऊ आलेले. सारा स्त्रीवर्ग आपल्याकडे मानराजमध्ये आलेला. आईने साºयांना तुझे फोटो दाखवले. साºयांना तू आवडलीस. आपली आंगणबाग तर साºयांनी वारवाणली. 
केतू,  मागे एकदा नीरजच्या खोलीवर त्याची मैत्रीण आलेली तुला आवडले नाही. (हे मला नीरजनेच सांगितले आहे.) प्रेम एकावरच असते केतू. बाकी साºयांवर असते ती माया. नीरजचे जसे मित्र-मैत्रिणी आहेत, तसे तुझेही असणारच नां? आणि तुमचे माणूस प्राण्यावरच अगाढ प्रेम असेल तर मैत्रिचा हा सिलसिला जीवनभर सुरू असतो. यात फक्त परस्परांवर विश्वास असेल तर कुठेही कसलीही अडचण येत नाही. या बाबतीत मी अधिक स्नेहश्रीमंत आहे. माझ्या भरपूर मित्र-मैत्रिणी आहेत. आई आणि माझ्यात त्यावरून कधीही वाद नाही.
नीरजला कांजण्या झाल्या होत्या. त्या वेळी त्याची तू जी काळजी घेतलीस, त्याला रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलवर सोडायलाही आलीस. (आम्ही तो वाकडेवाडीचा मार्ग नेहमी पाहतो ना.... ब्रीजच्या खालून जाणारा तो बोगद्याचा मार्ग तर आईला फारच भीतीदायक वाटतो.) त्याला ट्रॅव्हलवर सोडून तू तुझी अ‍ॅक्टिव्हा घेऊन एकट्याने परत गेलीस. तो बरा होऊन परतल्यावर तू पहाटे ५-५.३० ला उठून त्याला घ्यायलाही गेलीस. आम्हा दोघांनाही तुझे खूपच कौतुक वाटले. तुम्हा दोघांना आता गाडीही शिकून घ्यावी लागणार आहे. सततच्या पावसाने काहीसा गारठा वाढला आहे, घरातही थंडी वाजतेच. 
तुझे आजोबा, अण्णांचा वाढदिवस आहे, हे तू सांगितलेस हे चांगले केलेस. फोनवर अण्णांशी माझे-आईचे बोलणे झाले. अण्णांचा आवाज मात्र तरुण आहे. अण्णा म्हणाले, ‘आता आपली भेट कधी?’
तुला कॉलेजने पुन्हा आॅर्डर दिली हे तुझ्या मेहनतीचे-सचोटीने शिकवण्याचे फळ आहे. विद्यार्थ्यांनीच तुझी मागणी केली, हे किती सुंदर? आपला शिक्षक-आपला डॉक्टर हवाहवासा वाटायला  हवा. म्हणून छान कपडे घालावे. हसतमुख राहावे. आता आमची केतू मोठी झाली असे वाटते.... पण ती लहान बाळासारखी हट्टीही आहे, हेही छान आहे.
तुला आई आणि माझे प्रेमाशीष
तुझे-आई-बाबा.