अलफैज उर्दू हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार होते. मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांनी भाषेवरून माणसाची ओळख होते, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीत गायन, कविता वाचन केले. सूत्रसंचालन आयशा खान यांनी केले, तर आभार मुनव्वर सुलताना यांनी मानले. कार्यक्रमासाठी आसीम पिंजारी, शेख तौफीक, शेख नवाब, जाहीद खान, शाहीन कुरेशी, शेख समरीन, जुबेर खान, जमील खान, शेख रिजवान, अजहर खान, खीजर खान आदींनी परिश्रम घेतले.
००
नानासाहेब विद्यालय
नानासाहेब आर.बी. पाटील विद्यालयात आर.बी. पाटील यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक संदीप ठोसरे व भागवत माळी यांनी हिंदी लेखकांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता गायन, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले, तर आभार सोनल कपोते यांनी मानले.
००००
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चवरे, सुषमा थोरात यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश तायडे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, मंगला दुनाखे, सचिन दुनाखे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन स्वाती पाटील यांनी केले.
०००००००
महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित स्पर्धेत प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर एम.ए. वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
००००
श्रीराम माध्यमिक विद्यालय
श्रीराम माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षिका प्रतिभा पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दिवाकर जोशी, दिनेश पाटील, भगवान लाडवंजारी, संतोष चाटे उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी पाटील प्रथम, नंदिनी पाटील द्वितीय तर कविता गायन स्पर्धेत तेजस्विनी सोनवणे प्रथम, प्रणाली तोमर द्वितीय, तर तृतीय क्रमांक रोशनी पवार हिने पटकाविला. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले तर आभार संजय बडगुजर यांनी मानले.
००००
विद्या इंग्लिश स्कूल
विद्या इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक, गीत, नृत्य यातून हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया सुरवाडे, मीनाक्षी पाटील, प्रिया बाजपायी यांनी परिश्रम घेतले.
००००
महात्मा गांधी विद्यालय
भादली बुद्रूक येथील महात्मा गांधी विद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. धनगर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभागप्रमुख पी. जी. बागुल उपस्थित होते. आर. पी. अत्तरदे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व विशद केले, तर राजश्री सोनवणे, डिम्पल चौधरी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. अंकिता कोळी हिने सूत्रसंचालन केले तर जयश्री मिस्तरी हिने आभार मानले.