शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून साडेसात कोटींच्या निविदांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:02 IST

अभियंत्यांवर गंभीर आरोप; अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश

जळगाव : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने जलशक्ती अभियानाअंतर्गत ७ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता वादात सापडल्या आहेत़ कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांनी अध्यक्षा, पदाधिकाºयांना अंधारात ठेवून या मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे संबधित अधिकाºयांच्या कर्मचाºयांच्या चौकशीच्या सूचना उपाध्यक्षांनी दिल्या आहेत.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा शुक्रवारी झाली. त्यात हा प्रशासकीय मान्यतेवरुन जोरदार चर्चा झाली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त नियत्वेमधील पाच ते सहा कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यता या सुरूवातीलाच अध्यक्षा, पदाधिकाºयांना कुठलीही कल्पना न देता देण्यात आल्या होत्या़ त्यामुळे कार्यकारी अभियंता नाईक यांच्यावर कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला होता़ या कामांच्या कार्यारंभ आदेशांना स्थगिती देण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला होता़ चौकशी समितीही नेमण्यात आली होती़ आधीच्या कामांबाबत चौकशी समितीच्या अहवालाचा पत्ता नसताना पुन्हा सात कोटींच्या कामांची कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांनी कुणालाही कल्पना दिली नसल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाºयांनी मांडला़ स्थगिती असतानाही आधीच्या कामांना कार्यारंभ आदेश दिल्याचेही समोर आले़ त्यामुळे पदाधिकाºयांनी तीव्र संताप व्यक्त केला़या विषयांवरही चर्चास्वच्छ भारत मिशन अंतर्गत दीड कोटींचे हे बॅनर असल्याने याबाबत ई- निविदा का केली नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ यावर मिशन मोडवर हे अभियान राबवायचे असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले़माजी शिक्षणाधिकाºयांच्या ड्रायव्हरच्या सहीने मान्यतातत्कालीन शिक्षणाधिकारी महाजन यांच्या ड्रायव्हरने स्वाक्षºया करून शिक्षकांना मान्यता दिली तसेच या मान्यतेबाबत माध्यमिक शिक्षण विभागावर सदस्य मधुकर काटे यांनी गंभीर आरोप केले. यासह बदली प्रक्रियेत अधिकाºयांचा हस्तक्षेप वाढला असून त्यांच्या बदल्या कराव्यात हाही मुद्दा मांडण्यात आला़ यावर रावेर येथील गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांची बदली करण्याच्या सूचना उपाध्यक्षांनी केली. प्राथमिक विभागाच्या बदली प्रक्रियेबाबत पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली़जलशक्ती अभियानात निधी वर्गजलशक्ती अभियानाअंतर्गत रावेर व यावल तालुक्यात ७ कोटी ३८ लाख रूपयांची १०५ कामे असल्याचे लघुसिंचन विभागाकडून सांगण्यात आले आहे़ मतदारसंघातील कामांबाबत उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनाही माहिती नसल्याचेही समोर आले़ निधी वर्ग करताना जिल्हा नियोजनची मंजुूरी नाही, १२ कोटी रूपयांचे सुरूवातीला नियोजन देताना जलशक्तीच्या हेडखाली नव्हते, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले़आपण निसर्गोचार केंद्रात दाखल आहोत. त्यामुळे आता कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, मंगळवारी यावर बोलता येईल.- आर.के. नाईक,कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग. जि.प. जळगाव.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव