शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तब्बल ८० घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:26 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन लाखांचे दागिने हस्तगत

जळगाव : शहरासह उत्तर महाराष्ट व मध्य प्रदेशात तब्बल ८० घरफोड्या करणाºया पप्पू शहाबान हसन अन्सारी (५०, रा. धुळे) या अट्टल गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याने दोन दिवसापूर्वी शिवाजी नगरात खुर्शीद हुसेन मजहर या वृध्द दाम्पत्याकडे घरफोडी केली होती. तेथील दोन लाखाचे दागिने अन्सारीकडे आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत.शिवाजी नगरातील खुर्शीद हुसेन मजहर (८०) यांच्याकडे घरफोडी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी ही घटना गांभीर्याने घेऊन याआधीही झालेल्या घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपासाचे नियोजन करुन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना सूचना केल्या होत्या. गेल्या दोन दिवसापासून रोहोम यांचे पथक याच घरफोडीच्या तपासात लागलेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल केल्यानंतर पप्पू अन्सारी हा निष्पन्न झाला. त्याची गुप्त माहिती काढली असता तो पुन्हा घरफोडीसाठी सोमवारी शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, अशोक महाजन, अनिल इंगळे, संतोष मायकल, सुनील दामोदरे, भास्कर पाटील, विजयसिंग पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, विजय श्यामराव पाटील, परेश महाजन, दर्शन ढाकणे, इद्रीस पठाण व तांत्रिक माहिती पुरविणारे विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांच्या पथकाने त्याला आकाशवाणी चौक परिसरात सापळा लावून पकडले.फक्त बोहरा समाजाचे घर टार्गेटअन्सारी याने आतापर्यंत जेथे घरफोड्या केल्या आहेत, त्यातील ९० टक्के घरफोड्या हा बोहरी समाजाच्या लोकांकडेच केल्या आहेत. संशय येवू नये म्हणून बोहरी समाजाचा पेहराव घालून तो त्यांच्या घर व परिसरात वावरतो. विशेष म्हणजे सर्व घरफोड्या त्याने दिवसाच केल्या आहेत. अन्सारी हा धुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.८० घरफोड्या ४८ खटले न्यायालयातअन्सारी याने जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, साक्री, बºहाणपुर, कन्नड, मालेगाव, नंदूरबार, पाचोरा, पारोळा व धरणगाव येथे ८० घरफोड्या केल्या असून ४८ केसेस त्याच्याविरुध्द सध्या न्यायालयात सुरु आहेत. घरफोडी करताना तो कोणालाही सोबत घेत नाही, हे त्याचे वैशिष्टे आहे. शहरातील बहुंताश घरफोड्या त्याच्याकडून उघड होणार आहेत.सोफराजाकडून पावणे चार लाखाचे दागिने हस्तगतघरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला राजेंद्र उर्फ सोफराजा दत्तात्रय गुरव व त्याचा साथीदार अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील याच्याकडून आतापर्यंत ३ लाख ७४ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती निरीक्षक बापू रोहोम यांनी पत्रकारांना दिली. त्यात १०६ ग्रॅम सोन्याचे तर ४२९ ग्रॅम चांदीचे दागिने आहेत.उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हवालदार रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल जाधव, विनोद पाटील, पल्लवी मोरे,दीपक पाटील, महेश पाटील व दादाभाऊ पाटील यांनी हा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केला.१४ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांना सोमवारी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव