शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:14 IST

श्रीरामनगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी (३२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफोनवर बोलत असताना केला हल्ला १० ते १५ मिनिटे सुरू होता थरारएसपी व अपर पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट

भुसावळ : शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी (३२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मयत विलास चौधरी व संशयित आरोपींमध्ये २२ रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादातून ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली होती. मयत विलास यांचे वडील दिनकर लक्ष्मण चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलास दिनकर चौधरी (३२) हा २५ रोजी रात्री अकराच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराबाहेर सिमेंटच्या बेंचवर बसून फोनवर बोलत होता. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा व आकाश गणेश पाटील (राजपूत) हे तरुण मोटारसायकलीने आले. त्यांनी विलासवर चाकूने वार केला. हा हल्ला विलासच्या दंडावर झाला. यावेळी विलास हा घाबरून घरात पळत गेला व घराची कडीकोंडा बंद केला. विलासचा आवाज ऐकून त्याचे वडील व आई हेही आरडाओरड करू लागले. विलासच्या दंडातून रक्तस्राव होत असल्यामुळे त्याच्या दंडावर आईने कापडी पट्ट््या बांधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तीन आरोपी घराबाहेर उभे होते. यावेळी विलास यांनी मित्रांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाच मिनिटानी तीनही आरोपींनी विलासच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजावर फरशीने घाव करून दरवाज्याचा कडीकोंडा तोडला. यावेळी विलास पुढच्या खोलीतून मागे धावत आला. तीनही आरोपी घरात शिरले असल्याचे पाहून त्याचे आई वडील आरडाओरड करू लागले. तोपर्यंत अभिषेक शर्मा याने पिस्तोल् मधून विलासच्या छातीवर गोळी मारली . यावेळी विलास हा घरात कोसळला. १० ते १५ मिनिटे हा थरार सुरू होता. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून धाव घेतली.घरामध्ये रक्ताचा सडा पडला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विलास चौधरी गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीवायएसपी गजानन राठोड घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत विलास यांच्या वडिलांशी चर्चा केली. यावेळी डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हेही उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ