शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चाळीसगावसह सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:28 IST

टंचाई उपाययोजना बंद

जळगाव : यंदा वरुणराजाने संपूर्ण जिल्ह्यावर कृपा केल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार झाली असून कमी पाऊस असलेल्या चाळीसगाव तालुक्यातही गुरुवारी एकाच दिवसात ३६.१ मि.मी. पावसाची भर पडून तो ६५६.६ टक्क्यांवरून ६९२.७ मि.मी.वर पोहचला. त्यामुळे या तालुक्याने शंभरी ओलांडत तेथे २६ सप्टेंबरपर्यंत १०४.९ टक्के पाऊस झाला. विशेष म्हणजे या तालुक्याने जळगाव व धरणगाव तालुक्यालाही मागे टाकले आहे. जिल्ह्यात रावेर तालुक्यात तर ४०.३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील सर्व दुष्काळी उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत.उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वांची चिंता वाढविली होती. मात्र त्यानंतर झालेल्या जोरदार व सलग पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी झाली. यात अगोदर जामनेर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र रावेर व यावल तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने या दोन्ही तालुक्यात यंदाचा सर्वात जास्त पाऊस झाला आहे.गेल्या आठवड्यात केवळ जळगाव, धरणगाव व चाळीसगाव तालुक्यांचीच पावसाची शंभरी गाठायची बाकी असताना जळगाव व धरणगाव तालुक्यातही १०० टक्के पाऊस झाला. २६ सप्टेंबरपर्यंत या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १०३.४ व १०३.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.२५ सप्टेंबरपर्यंत केवळ चाळीसगाव तालुक्याचीच शंभरी गाठायची बाकी होती. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत या तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ८० टक्केच्या आतच पाऊस होता. मात्र पावसाच्या संततधारेने या तालुक्याचीही पावसाची सरासरी २५ रोजी ९९.४ टक्क्यांवर पोहचली व त्यात २६ रोजी आणखी साडेपाच टक्के पावसाची भर पडून चाळीसगाव तालुक्याने शंभरी ओलांडली.दुष्काळी उपाययोजना बंदजिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापर्यंत तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील हे टँकर बंद करण्यासह इतरही दुष्काळी उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत.तालुकानिहाय पाऊसतालुका टक्केवारीजळगाव १०३.४जामनेर ११८.९एरंडोल १२०.२धरणगाव १०३.३भुसावळ १२२.०यावल १२५.१रावेर १४०.३मुक्ताईनगर ११८.४बोदवड १२५.५पाचोरा ११३.०चाळीसगाव १०४.९भडगाव १०६.३अमळनेर १११.०पारोळा ११२.८चोपडा ११५.६एकूण ११६.१

टॅग्स :Jalgaonजळगाव