शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मुंबईकडून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:04 IST

प्रवाशांचे हाल : अकोला व नागपूरकडे जाणारे प्रवासी स्टेशनवर ताटकळले

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे रविवारी रेल्वे प्रशासनाने मुंबईकडून भुसावळकडे येणाºया दिवसभरातील सर्व गाड्या रद्द केल्या. भुसावळकडून मुंबईकडे जाणाºया गाड्याही ४ ते ५ तास विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विशेष म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रातील मुंबईहून जळगावला एकही गाडी न आल्यामुळे प्रवाशांना घराकडे परतावे लागले.गेल्या आठवड्यातच मुंबईतील पावसामुळे अप आणि डाऊन मार्गावरच्या सर्व गाड्या चार ते पाच तास विलंबाने धावल्या होत्या. यामुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी मुंबईकडुन येणा-या सर्व गाड्यांचा खोळंबा झाला.मुंबईहून मध्यरात्री सुटणाºया आणि सकाळच्या सत्रातील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. रविवारी मुंबईकडुन येणारी एकही गाडी न आल्यामुळे अकोला व मनमाडकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.तसेच दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणा-या गाड्याही विलंबाने धावत होत्या. बहुतांश गाड्या ईगतपुरी व नाशिकपर्यंत धावल्या. यामुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.हुतात्मा एक्सप्रेससह भुसावळ-मुंबई पॅसेंजरही आज रद्दमुंबईतील पावसामुळे भुसावळ रेल्वे प्रशासनाने ५ आॅगस्ट रोजी अप आणि डाऊनची भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द केली आहे. तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर, अमरावती एक्सप्रेस व तुलसी एक्सप्रेस या गाड्या सोमवारीही रद्द करण्यात आल्या आहेत.सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकहून माघारीनागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी मुंबईला न जाता, नाशिकपर्यतच धावली. तर हीच गाडी नागपूरकडे जाण्यासाठी नाशिकहूनच माघारी फिरुन नागपूरकडे रवाना झाली. तर मुंंबई-जबलपूर व दुरंतो एक्सप्रेसही नाशिकपर्यंत धावली. तसेच मुंबई- हावडा एक्सप्रेस मनमाडपर्यंत व जनता एक्सप्रेस देवळालीपर्यंत धावली.१)मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस२)मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस३) गोरखपूर काशी एक्सप्रेस४) लोकमान्य टिळक कामाख्या५) लोकमान्य टिळक भागलपूर६)गोरखपूर गोदान एक्सप्रेस७) दरंभागा पवन एक्सप्रेस८)वाराणसी कामायनी एक्सप्रेस९)लोकमान्य टिळक गोरखपूर१०) मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस११) कानपूर उद्योगनगरी एक्सप्रेस१२) सुलतान पूर सुपरफास्ट एक्सप्रेस१३) मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस१४) मुंबई अमरावती एक्सप्रेस१५) मुंबई फिरोजपूर पंजाब मेल१६) मुंबई नागपूर दूरंतो एक्सप्रेस१७) मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस१८) मुंबई हावडा व्हाया अलाहाबाद१९) लोकमान्य टिळक शालिमार२०) गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस 

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव