शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ठिकठिकाणी १ लाख ८० हजाराची गावठी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 21:58 IST

एमआयडीसी, शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई

जळगाव : शहरातील वेगवेगळ््या भागात पोलिसांनी गावठी दारु हातभट्टींवर धाड टाकून एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकूण दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक महिला फरार झाली आहे. ही कारवाई गुरुवारी वेगवेगळ््या ठिकाणी करण्यात आली.शहरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ‘वॉशआॅऊट’ मोहिम सुरु आहे. त्यानुसार एमआयडीसी, शनिपेठ व तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीत गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. यात एमआयडीसी पोलिसांनी दीड लाख, तालुका पोलिसांनी २६ हजार, तर शनिपेठ पोलिसांनी ३४०० रुपयांची गावठी दारु जप्त केली.एमआयडीसी पोलिसांनी कंजरवाडा येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ५४ हजार ८०० रूपयांची गावठी दारू व रसायन तसेच दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी एका जणास ताब्यात घेण्यात आले.कंजरवाडा येथे चेतन देविदास बाटूंगे व चमनबाई गुड्ड्या माचरेकर हे अवैधरित्या गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, अतुल वंजारी, दीपक चौधरी, अशोक सनगत, सचिन चौधरी, स्वप्निल पाटील, पंकज सापकर, परमेश्वर पाटील, हर्षवर्धन सपकाळे आदींनी कंजरवाडा येथे दारू अड्ड्यावर धाड टाकली.या कारवाईत पोलिसांनी चेतन देविदास बाटुंगे यांच्याकडून ८१ हजार ६०० रुपये किमतची गावठी हात भट्टी दारु, रसायन व चमनबाई गुड्ड्या माचरेकर या महिलेकडून ७३ हजार २०० रुपये किमतीची गावठी दारु, रसायन असा एकूण १ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात संशयित चेतन बाटुंगे यास ताब्यात घेतले़भोलाणे, खेडी येथे २६१०० रुपयांची गावठी दारु जप्ततालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षिक कदीर तडवी, पोलीस नाईक विलास शिंदे, पो. कॉ. मिथून पाटील, धर्मेंद्र ठाकूर यांच्या पथकाने भोलाणे तसेच खेडी बुद्रुक येथील गावठी अड्ड्यांवर कारवाई केली. यात भोलाणे येथे दोन ठिकाणी कारवाई करुन २५ हजार ५०० रुपयांची गावठी दारु व साहित्य जप्त केले. हिंमत भास्कर कोळी, गणेश श्यामराव कोळी रा. भोलाणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खेडी बुद्रुक येथे ६०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात येवून महिलेवर कारवाई करण्यात आली.वाल्मिकनगरातून ३४०० रुपयांची गावठी दारु जप्तशनिपेठ पोलिसांनी वाल्मिक नगर भागातील गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा टाकून १ हजार ८०० रूपयांची ३५ लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी गावठी दारु विक्री करणाºया एका तरुणाला ताब्यात घेतले तर महिला फरार झाली.वाल्मिकनगर परिसरातील दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी दारुची हातभट्टी सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी खटाबाई आनंदा सोनवणे (वय ४५, रा. वाल्मिक नगर) या दारु विक्री करणारी महिला फरार झाली. पोलिसांनी घटनास्थळाहून १ हजार ८०० रूपयांची ३५ लिटर दारू जप्त केली आहे.वाल्मिकनगर परिसरातच दुसºया घटनेत पो.कॉ. संजय शेलार, अमोल विसपूते, राहुल घेटे यांच्या पथकाने कारवाई केली. शरद रामदास बाविस्कर (वय ३५, रा. वाल्मिक नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील १ हजार ६०० रूपयांची दारू हस्तगत केली. दोन्ही घटना प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव