शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘महायुती’सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी दिसली ‘बेदखल’! पाचोऱ्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:47 IST

पाचोऱ्यात भाजप-शिंदे सेनेची ताकद, ‘घड्याळ’ मात्र दिसले बंद

कुंदन पाटील, जळगाव: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘युती’त विकासाच्या नावाखाली ‘एन्ट्री’ करणाऱ्या अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला बेदखल ठरविण्यात आले आल्याचे चित्र मंगळवारी पाचोऱ्यात दिसून आले. शहरभर लागलेल्या फलकांवर भाजप-शिवसेना नेत्यांचाच बोलबाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र फारसे स्थान दिल्याचे दिसून आले नाही.

राज्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यासह समर्थकांनी शहरभर फलकबाजी केली. नेत्यांचे कटआऊटस्‌ही मोठ्या प्रमाणावर लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, अमीत शहा, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आर.ओ.पाटील यांच्यासह अनेकांचे कटआऊटस्‌ झळकले. अजीत पवारांचे नाममात्र कटआऊटस्‌ दिसले. सभेच्याठिकाणी भाजप-शिवसेनेचेच दुप्पटे दिसले. राष्ट्रवादीच्या चार-पाच महिलांनी ‘घड्याळ’चे दुपट्टे खांद्यावर घेत सभास्थळी हजेरी लावली. मात्र अजीत पवारांच्या राष्ट्रवादीला फारसे स्थान न दिसल्याने त्यांनीही खांद्यावरचे दुपट्टे गुंडाळून ठेवले.

अजित पवारही व्यस्तच

कार्यक्रमादरम्यान, अजीत पवारही निवेदनांसह विकास कामांच्या प्रस्ताव वाचण्यातच व्यस्त दिसले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी वारंवार चर्चा करताना दिसले. त्यामुळे अनेकांच्या भाषणाकडे त्यांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. स्वत:ही भाषण करताना अतिशय ‘कागदी’ बोलले. त्यामुळे सडेतोड बोलणारे अजीत पवार पाचोराकरांना मंगळवारी जरा वेगळ्याच ‘मूड’मध्ये दिसले.

घोषणेविना निरोप

एकनाथ शिंदे व अजीत पवार यांच्याकडून दुष्काळासह अन्यप्रश्नी काही घोषणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र दोघांनीही फक्त विकासाचा ‘पाढा’च वाचला. त्यामुळे अनेक जण कार्यक्रमात ‘डुलक्या’ घेताना दिसले. मुख्यमंत्रीही सोपस्कार आटोपण्यात व्यस्त दिसले. तेही फार उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देत नव्हते. एकाच हाताने लाभ वाटप करीत त्यांनी लाभार्थ्यांचा निरोप घेत गेले. ही बाबही अनेकांना खटकत गेली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार