शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
4
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
5
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
6
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
7
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
8
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
9
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
10
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
11
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
12
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
13
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
14
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
15
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
16
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
17
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
18
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
19
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
20
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश

अजिंठा चौफुलीवर महिलांचा विरोध

By admin | Updated: March 1, 2017 00:25 IST

‘अतिक्रमण हटाव’ : रात्री आठ वाजेर्पयत धडक कारवाई, अनेक ठिकाणी दुजाभावचा आरोप

जळगाव : महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या जागेवरील अतिक्रमण निमरूलन मोहीमे दुस:या दिवशीही राबवून मानराज पार्क ते अजिंठा चौफुलीदरम्यानचे अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभर कोठेही विरोध नसताना संध्याकाळी मात्र अजिंठा चौफुलीवर टप:यांचे अतिक्रमण काढण्यात महिलांनी विरोध करीत त्या या अतिक्रमणासमोर उभ्या राहिल्या. अखेर त्यांना हटवून तेथील अतिक्रमणही काढण्यात आले.  सकाळी 8 वाजता मानराज पार्कपासून अतिक्रमण काढण्यात सुरूवात झाली. कारवाईत बँकांचे फलक,  दूरध्वनीचे खांबही काढण्यात आले. अजिंठा चौफुलीवरील काही वेळ झालेला विरोध वगळता मोहीम शांततेत सुरू होती. दरम्यान, इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यान कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिका:यांकडे झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार दुस:या दिवशी 28 फेब्रुवारी रोजीदेखील महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आले. त्यानुसार सकाळी 8 वाजेपासून मानराज पार्कजवळ महापालिकेतील बांधकाम, इलेक्ट्रीकल, बांधकाम, नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी  पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा या मोहीमेत सहभागी झाला होता. मानराज पार्कपासून शहराकडे येताना महामार्गाला लागून असलेल्या सर्वच अतिक्रमणावर पथकाने कारवाई केली. यात टपरी, हातगाडय़ा यासह पत्रे, गोल अँगल, दूरध्वनी खांब, लोखंडी फलक, जाळ्य़ा, लाकडी दांडे, स्टूल, लोखंडी पेटी, हिरव्या जाळ्य़ा यासह बँक ऑप बडोदाचा फलक असे साहित्य जप्त करण्यात आले. अजिंठा चौफुलीवर विरोधमहामार्गावर कारवाई दरम्यान कोठेही विरोध झालेला नसताना अजिंठा चौफुलीवर मात्र मोबाईल साहित्य, वडापाव, एसटीडी व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असलेले अतिक्रमण काढताना तेथे विरोध करण्यात आला. या ठिकाणी दोन महिला या अतिक्रमणासमोर उभ्या राहिल्या व आमच्या घरच्या लोकांना येऊ द्या, आम्ही काढून घेऊन असे सांगत होत्या. मात्र अतिक्रमण हटाव पथकातील महिलांनी या महिलांना बाजूला करीत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण अत्ररश: तोडून काढण्यात आले. यात संपूर्ण दुकानांचे भंगार झाल्याचे चित्र होते. हे साहित्य घेऊन औद्योगिक वसाहत परिसरातील अग्निशमन विभागाच्या गोदामात नेण्यात आले. कारवाईदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठय़ा टप:या उचलण्यात येत होत्या. कोणताही वाद होऊ नये म्हणून प्रचंड पोलीसाचा ताफा तैनात होता. अतिक्रमण हटविताना इच्छादेवी चौफुली ते अजिंठा चौफुलीदरम्यान नियमानुसार जे मोजमाप आहे, त्यामध्ये येणारे अतिक्रमण काढले गेले नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला. दुस:या दिवशी जास्त साहित्य जप्त4सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा मंगळवारी जास्त कारवाई करण्यात आली. यात साहित्यही जास्त जमा करण्यात आले. रात्रीर्पयत सुरू होती कारवाई4कारवाईच्या दुस:या दिवशी मंगळवारी रात्री आठ वाजेर्पयत अतिक्रमण काढण्यात आले. 27 व 28 असे दोन दिवस ही कारवाई करण्यात येणार असल्याने रात्रीर्पयत अतिक्रमण काढण्यात आले. बघ्यांची गर्दी4महामार्गावर मानराज पार्कपासून ते थेट अजिंठा चौफुलीदरम्यान अतिक्रमण हटविताना प्रत्येक चौकात व ठिकठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होत            होती.