शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

वातानुकूलित संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:54 IST

‘एसी संस्कृती’चा दुसरा फटका बसला आहे तो काम करण्याच्या ठिकाणाला म्हणजे आॅफिसला. इथेही बंद केबिन, बंद दरवाजे, बंद संवाद आणि बंद मने. त्यातून येणारा कामाचा ताण, होणारी घुसमट, मन मोकळं करायला कोणीच नाही आणि मग परिणाम, सहकाºयांशी भांडणं, बॉसशी भांडणं, नोकरी सोडणं, नवी नोकरी शोधणं, शेवट नैराश्य आणि कधी कधी ...

‘एसी संस्कृती’चा दुसरा फटका बसला आहे तो काम करण्याच्या ठिकाणाला म्हणजे आॅफिसला. इथेही बंद केबिन, बंद दरवाजे, बंद संवाद आणि बंद मने. त्यातून येणारा कामाचा ताण, होणारी घुसमट, मन मोकळं करायला कोणीच नाही आणि मग परिणाम, सहकाºयांशी भांडणं, बॉसशी भांडणं, नोकरी सोडणं, नवी नोकरी शोधणं, शेवट नैराश्य आणि कधी कधी आत्महत्याही. तोच प्रकार प्रवासाच्या बाबतीत.पूर्वी ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार मनुजा चातुर्य येत असे फार, असे म्हटले जात असे. पण प्रवासही तसाच होता. कसा?झुकुझुकु झुकु आगीन गाडी,धुराच्या रेषा हवेत काढी,पळती झाडे पाहू या,मामाच्या गावाला जाऊ या’.पण आज धुरांच्या रेषा काढणारी आगीनगाडी नाही. पळती झाडे नाहीत आणि मामाचा गावही नाही.पूर्वीच्या प्रवासात सर्वसाधारण डबा, त्यात येणारा गावोगावीचा, प्रांतोप्रांताचा पिसाट वारा, उघडे दरवाजे आणि उघड्या खिडक्या यातून होणारे त्या त्या ठिकाणचे निसर्गदर्शन, मानवी दर्शन, माणसांशी प्रवासात होणारा मनमुराद मोकळा संवाद, त्यातून उलगडत जाणारी संस्कृती हे सारेच माणसाला खूप काही शिकविणारे होते, चतूर करणारे होते. पण आता प्रवासही वातानुकूलित झालाय. म्हणजे परत तेच.रेल्वे किंवा बसगाडीच्या कोचचे बंद दरवाजे. बंद खिडक्या आणि बंद मने. त्यातच आलेय इंटरनेट. सोशल मीडिया, त्यात संपूर्ण प्रवासभर ‘स्मार्ट फोन’कडे डोळे लावून बसलेली आणि कानात हेडफोन घातलेली माणसे.समोरच्याचा चेहरा वाचणे, डोळ्यात बघणे, संवाद साधणे हे तर सोडाच; परंतु कुणी एखाद्या संकटप्रसंगी भयाने जीवाच्या आकांताने ओरडले तर आम्हाला ऐकूसुद्धा येणार नाही.ही झाली आतली परिस्थिती, मग बाहेरच्या जगाशी, त्या-त्या प्रांताशी आमचा संपर्क येणे, त्यातून संस्कृतीचे दर्शन होणे आणि चातुर्य येणे या तर कल्पनेपलीकडच्या गोष्टी आहेत. आजचा आमचा प्रवास म्हणजे नुसती निरर्थक धावपळ, असे म्हटले तर वावगे ठरू नये.‘एसी संस्कृती’चा सर्वात मोठा धोका म्हणजे पर्यावरणातील ‘ओझोन’ थराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि ओझोनची होणारी क्षती म्हणजे साक्षात सृष्टीचा, पृथ्वीचा नाशच.आम्ही आमच्या भावी पिढीला काही देऊ शकू की नाही माहीत नाही, पण एक संकल्प प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून, हाडाची काडे करून आपल्या सुखाचा, सर्वस्वाचा त्याग करून, प्रसंगी प्राणांचे बलिदान करून जे जे उत्तम, उदात्त आणि सुखकारक असे निर्माण केले आहे, मग ते पर्यावरण असेल, संस्कृती असेल, कुटुंब व्यवस्था- समाजव्यवस्था असेल ते उन्नत करता आले नाही.वाढवता आले नाही, तरी किमान मी त्याचा नाश करणार नाही. त्याच्या नाशास स्वत: कारणीभूतही होणार नाही आणि इतर कोणास होऊ देणार नाही, एवढे केले तरी खूप होईल असो.(उत्तरार्ध)- विलास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव