शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जगवाणी आॅईल मिलमध्ये ‘अग्नितांडव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:46 IST

लाखोंचे नुकसान : पाच अग्निबंबाच्या मदतीने आग आटोक्यात

जळगाव- औद्यागिक वसाहत परिसरातील बी-११ मधील जगवाणी आॅईल मिलला शुक्रवारी रात्री ११ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे हाहाकार उडाला होता. अखेर पाच अग्निशमन बंबाच्या मदतीने रात्री सव्वा वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ मात्र, या आगीत लाखो रूपयांचे खोबरे, तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झालेले होते.आरटीओ कार्यालय परिसरातील रहिवासी हरिष जगवाणी यांच्या मालकीची औद्यागिक वसाहत परिसरातील बी-११ मध्ये जगवाणी आॅईल मिल आहे. याठिकाणी खोबरे तेल, तूपाची निर्मिती केली जाते. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मिलच्या मागील बाजूने धूर निघत होता. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षारक्षकाने लहान बॉयलर बंद केले. मात्र, रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे मिलमध्ये टेवलेल्या खोबरे व सरकी ढेपला आग लागली. धुराचे लोळ उठू लागल्यामुळे परिसरातील नागरिकांना कंपनीत आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित हा प्रकार सुरक्षारक्षकास सांगितला़ व कंपनी मालक आणि पोलिसांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.आगीने धारण केले रौद्ररूपआगीने दहा ते पंधरा मिनिटातच रौद्ररूप धारण केले़ बघता-बघता संपूर्ण कंपनीत आतून आग लागली़ त्यामुळे आगीचे लोळ उठत होते. तर आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक तसेच सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी, हेमंत काळसकर यांच्यासह पोलिसांच्या ताफ्याने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली़ कंपनीचे मालक हरिष जगवाणी सुध्दा घटनास्थळी दाखल झालेले होते.अखेर आग आटोक्यातआगीची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचा विलंब न करता महापालिकेच्या दोन अग्निशमनबंबाने घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला़ मात्र, आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना अपयश येत होते. नंतर जैन कंपनीच्या अग्निशमन बंब पुन्हा दोन मनपाच्या अग्निशमन अशा एकूण पाच बंबाच्या मदतीने पाण्याचा मारा करित रात्री १.१५ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली.यावेळी आमदार सुरेश भोळे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले होते. या आगीत मात्र, लाखो रूपयांचे खोबरे, खोबरे तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव