नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 05:07 PM2020-02-02T17:07:24+5:302020-02-02T17:08:27+5:30

: नियामक मंडळाच्या जाचक अटीविरोधात५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे पतसंस्थाचालकांचा मेळावा आयोजित केला आहे.

 Against inquiries of the regulatory body, the credit institutions should meet on July 7 | नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा

नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा

Next

पारोळा, जि.जळगाव : नियामक मंडळाच्या जाचक अटीविरोधात५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे पतसंस्थाचालकांचा मेळावा आयोजित केला आहे.
जिल्ह्यातील पतसंस्थांनी आपले कामकाज बंद ठेवून दुपारी १ वाजता एस. एम. आय. टी. कॉलेज जळगाव येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला उतरती कळा लागलेली असताना बहुतांश पतसंस्थाना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यात काही पतसंस्था नियम व धोरणानुसार सामना करून आपापल्या परिने कामकाज सुरळीत ठेवत असतानाच महाराष्ट्र शासनाने सहकार कायद्यात बदल करून नव्यानेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था नियमक मंडळाची स्थापना करून १५ जानेवारी रोजी राज्यातील पतसंस्थाना त्यांच्या जमा ठेवीच्या ०.०५ टक्के अंशदान सदर नियमक मंडळाकडे भरावे. तसेच ज्या पतसंस्थाकडे खेळते भांडवल एककोटी पेक्षा कमी आहे अशा पतसंस्थांना कर्जदारास ५० हजारांपेक्षा जादा कर्ज देता येणार नाही व एक कोटी पेक्षा जादा खेळते भांडवल असेल तर त्यांनाही लावलेल्या निकषांवर कर्ज वितरण करावे लागणार आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काही ही नमुद असले तरी नियामक मंडळ जे जाहीर करेल त्याप्रमाणे ठेवी व कर्जावरील कमाल व्याजदर सर्व बिनाकृषी पतसंस्थाना बंधनकारक राहतील. पतसंस्था ह्या आधीच आर्थिक संकटात आहेत. अंशदान कोठून भरणार? शासनाने ९७ व्या घटना दुरूस्तीने पतसंस्थांना स्वायत्तता दिली असताना पुन्हा या जाचक अटीचा सामना पतसंस्थाना करावा लागणार आहे.
राज्य शासनाने कलम १४४ नुसार सहकार कायदा दुरुस्ती करून घेतली आहे. त्या कलमातील तरतुदीप्रमाणे शासनाने एक नियामक मंडळ तयार केले आहे त्यातील शर्ती व अटी या अतिशय जाचक वाटत आहेत म्हणून जमा केल्या जाणाऱ्या अंशदान अनुदानाची रक्कम रद्द करण्यात यावी यासाठी ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पतसंस्थानी आपले कामकाज बंद ठेवून मेळाव्यास यावे, असे आवाहन जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, संचालक एम. बी. भाटिया, नरेंद्र पाटील, विजय दत्तात्रय नावरकर यांनी केले.

Web Title:  Against inquiries of the regulatory body, the credit institutions should meet on July 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.