शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुन्हा दोन गटात उफाळला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:46 IST

जळगावच्या तांबापुरा भागातील घटना:अकरा जणांना अटक

ठळक मुद्दे१८ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा; तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

जळगाव : गेल्या काही दिवसापासून खदखदत असलेला दोन गटातील वाद रविवारी दुपारी तांबापुरात उफाळून आला. दोन्ही गटाचे लोक एकमेकावर चालून गेले. यावेळी दगडफेकीचीही घटना घडली. परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या १८ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तांबापुरा व मेहरुण या दोन्ही भागात तणावपूर्ण शांतता आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिता फकिरा घुगे (रा.महादेव मंदिराजवळ, तांबापुरा) यांच्या फिर्यादीनुसार महादेव मंदिर परिसरात तांबापुरात दोन गटात वाद झाला होता. तेव्हा पोलीस व काही प्रमुख लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटविला होता. रविवारी दुपारी चार वाजता बिजासन घुगे याने आपण बाहेरगावी असताना आधीच्या भांडणात माझे नाव का घेतले असे शकीला कैय्युम खाटीक व सायराबी मोहम्मद रफिक यांना विचारायला गेला असता त्याचा राग येवून या दोघांसह रफिक साहेबबागवान, सुलतान कलीम शेख, शलील शेख, जावेद उर्फ तेड्या, कमा निसार शेख व परवीनबी शहाजद शेख यांच्यासह इतर पाच ते सहा जणांनी अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी शनी महादेव सोनवणे, रवींद्र गणपत घुगे, दीपक मनोहर चाटे, संगीता रवींद्र बाविस्कर यांनी भांडण सोडविले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.तर शकीला कय्युम खाटीक(रा.महादेव मंदिराजवळ, तांबापुरा) यांनीही दुसऱ्या गटाविरुध्द तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.या गटाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन बिजासन उर्फ बबलु फकिरा घुगे, दीपक मनोहर चाटे, दीपक राजाराम माळी, आकाश रवी चांभार, सनी महादेव सोनवणे, सचिन विक्रम वंजारी, राकेश (पुर्ण नाव नाही), रवींद्र उर्फ शेपट्या गणपत घुगे, अनिता फकिरा घुगे व संगीता रवींद्र बाविस्कर यांच्यासह इतर पाच ते सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, पोलिसांना चकवा देऊन फरार झालेला जावेद उर्फ तेड्या सय्यद जब्बार याला सहायक फौजदार अतुल वंजारी, रतिलाल पवार यांनी रात्री १० वाजता अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तांबापुरात रात्रीचा बंदोबस्त वाढविला आहे.अकरा जणांना अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या अकरा जणांना अटक केली. त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत. अटक केलेल्यांमध्ये शकीला कैय्युम खाटीक, सायराबी मोहम्मद रफिक व खलील शेख तर दुसºया गटाच्या बिजासन उर्फ बबलु फकिरा घुगे, दीपक मनोहर चाटे, रवींद्र गणपत घुगे, अनिता फकिरा घुगे व संगीता रवींद्र बाविस्कर यांचा समावेश आहे.पोलीस ठाण्यात शेकडोचा जमावया वादानंतर पोलिसांनी तांबापुरात धाव घेऊन काही जणांना ताब्यात घेतले असता दोन्ही गटाचे शंभराच्यावर जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. या जमावाला पांगविताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, पोलीस ठाण्यात गर्दी झाली त्याचवेळी पुन्हा तांबापुरात दगडफेकीची अफवा पसरली होती.