तीन आठवड्यानंतर सोन्यात घसरण, चांदीत मात्र तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:20 PM2019-08-31T13:20:42+5:302019-08-31T13:21:14+5:30

प्रती तोळा ३५० रुपयांनी भाव कमी, चांदी ४७ हजार रुपये किलोवर

After three weeks, gold fell and silver fell | तीन आठवड्यानंतर सोन्यात घसरण, चांदीत मात्र तेजी

तीन आठवड्यानंतर सोन्यात घसरण, चांदीत मात्र तेजी

Next

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ््या कारणांनी वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात ३० आॅगस्ट रोजी ३५० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. दुसरीकडे मात्र चांदीमध्ये तेजी सुरूच असून चांदी आता ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.
रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मे महिन्यापासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून तर ही वाढ अधिकच होत गेली.
मागणी घटण्यासह रुपयात सुधारणा
रशिया व चीनने सोन्याची खरेदी सध्या कमी केली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा होत असल्याने सोन्याचेही भाव कमी होण्यास मदत मिळत आहे. २८ आॅगस्ट रोजी ७१.८२ रुपयांवर असलेले डॉलरचे दर २९ रोजी ७१.६९ रुपये झाले व ३० रोजी ते ७१.४६ रुपये झाले. या सर्व परिणामामुळेच तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी झाले ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे.
चांदीत मात्र तेजी कायम
सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी चांदीमध्ये तेजी असल्याचे चित्र आहे. तसे पाहता डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा झाल्याने चांदीचे भाव कमी होणे अपेक्षित होते. मात्र येणाऱ्या सणासुदीच्या काळात चांदीच्या भांड्यांसाठी मागणी वाढणार असल्याने चांदीत तेजी कायम असल्याचे सांगितले जात आहे. २३ आॅगस्ट रोजी ४४ हजार रुपये प्रती किलोवर असलेली चांदी २४ रोजी ४५ हजार रुपये, २६ रोजी ४५ हजार ५०० रुपये २८ रोजी ४६ हजार ५०० रुपयांवर पोहचली. आता ३० रोजी चांदीचे भाव ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
तेजीचे चार महिने
लग्न सराईच्या काळात १५ मे रोजी सोने ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. तेव्हापासून ही वाढ अशीच सुरू राहून ६ जून २०१९ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले. २१ जून रोजी सोन्याचे भाव ३४,२०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ९ जुलै रोजी ३४ हजार ८०० आणि १० रोजी ३५ हजार रुपये प्रती तोळ््यावर सोने पोहचले. ५ आॅगस्ट रोजी सोने ३५ हजार ८०० रुपये व दुसºयाच दिवशी ६ आॅगस्ट २०१९ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले व ७ रोजी तर ते ९०० रुपयांनी वाढून ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. १३ रोजी तर सोने ३७ हजार ८५० रुपयांवर आणि २२ रोजी ३८ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतर २४ रोजी ३८ हजार ६०० रुपये आणि २८ आॅगस्ट रोजी सोन्याने ३९ हजाराचा पल्ला ओलांडत ते ३९ हजार १५० रुपयांवर पोहचले. मध्यंतरी केवळ ८ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावात ५० रुपयांनी घसरण होऊन ते ३७ हजार ३५० रुपयांवर आले होते. त्यानंतरही सोन्याचे भाव चढेच राहून ते ३९ हजार रुपयाच्या पुढे गेले. मात्र आता तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे.

रशिया व चीनने वाढविलेली सोन्याची खरेदी सध्या कमी केली आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा होत असल्याने सोन्याचे भाव कमी झाले आहे.
- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ असोसिएशन.

Web Title: After three weeks, gold fell and silver fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव