शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही जळगाव जिल्हा रुग्णालय समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:19 IST

२० दिवसांनंतरही रुग्णांचे हाल कायम

ठळक मुद्देचांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप

जळगाव : गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा बट्टयाबोळ झाला असून जिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा, अशा सूचना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या, मात्र तरीदेखील जिल्हा रुग्णालयात एका खाटेवर दोन-तीन रुग्ण टाकण्यासह रुग्णांचे हाल सुरूच असल्याचे चित्र २० दिवसांनंतरही कायम आहे.जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढून जागा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन अथवा तीन रुग्ण टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. शुक्रवारीदेखील ही समस्या कायम होती.गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असून आता वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने येथे रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य विभाग व परिवहन विभागाची ७ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींवर बोट ठेवत गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत संबंधिताना जाबही विचारला होता.समस्या कायमजिल्हा रुग्णालयात जागेअभावी अनेक प्रसूत महिलांना सतरंजी टाकून झोपवले जाते. त्या बाबत नवीन वॉर्डास मंजूरी मिळेल तेव्हा मिळेल पण पर्यायी व्यवस्था करा, असे राज्यमंत्री पाटील यांनी सूचविले होते. सोबतच तुमच्या आया बहिणींचे रुग्णालयात असे हाल झालेले तुम्हाला चालेल का? नाही काही तर गाद्यांची व्यवस्था करा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला होता, मात्र तरीदेखील समस्या कायम असून गेल्या आठवड्यात एका सिझेरियन झालेल्या महिलेला परिचारिकेने कक्षातून हाकलून दिले होते.त्यानंतर पुन्हा २७ रोजी एका खाटेवर तीन-तीन रुग्णांना टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे रुग्णांचे हाल कायम असल्याचे चित्र राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कायम असल्याचे शुक्रवारीदेखील दिसून आले.चांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरेजिल्हा रुग्णालयातून प्रसूतीसाठी महिलांना इतरत्र पाठविले जात नाही. रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने येथेच चांगले उपचार करण्यावर आमचा भर असल्याचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी सांगितले. रुग्णाला बाहेर पाठविल्यास वेगवेगळे आरोप होतात, मात्र तसे नसून गंभीर रुग्ण असला तरच त्याला इतरत्र पाठविले जाते. आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच चांगले उपचार करण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत असल्याचे डॉ. खैरे म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव