शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नराधम पतीनंतर आता वाल्मीक नगरातून मित्राच्याही मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:21 IST

रामानंदनगर पोलिसांची कारवाई :  न्यायालयात हजर करणार

जळगाव : . स्वत:च्या फायद्यासाठी एका विकृत पतीने अक्षरश: पत्नीला जखडून ठेवले आणि सोबत असलेल्या मित्राला अत्याचारात मदत केली. नंतर स्वत:सुध्‍दा पत्नीवर अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या प्रकरणात रविवारी पतीच्या मुसक्या आवळल्यानंतर मंगळवारी रामानंदनगर पोलिसांनी त्याच्या अत्याचारी मित्राला सुध्दा वाल्मीक नगरातून अटक केली आहे. रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा-हुडको) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शनिवारी समोर आली होती. धुळे येथील माहेरवासीनी असलेल्या महिलेचा वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायकाशी विवाह झाला होता. लॉकडाउनमुळे महिलेच्या पतीचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे पतीने मित्रासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु, राहत असलेल्या भागात भाजीपाला विक्री करण्‍याची लाज वाटत असल्यामुळे पतीने मित्राच्या भाड़याच्या घरात राहण्‍याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी मित्र रमेश हा एकटाच राहत होता. नंतर त्या भाड्याच्या घरात दोघं पती पत्नी आले. ८ जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचे सांगितले, यावरून दोघांमध्‍ये वाद झाला. अखेर रात्री पती बाहेरून परतल्यानंतर त्याने पत्नीला कोल्ड्रींग्स आणून तिला पाजले. अर्धातासानंतर तिला चक्कर आल्यानंतर पत्नी व त्याच्या मित्राने महिलेला बाथरूममध्‍ये नेले. नंतर पत्नीला पतीने पकडून ठेवल्यानंतर मित्र रमेश याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीने सुध्‍दा पत्नीवर अत्याचार केला होता. हा प्रकार माहेरच्यांना सांगितल्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात पती व त्यांच्या मित्राविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. रविवारी फरार पती हा पुण्याकडून जळगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर बसमधून उतरत असताना सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. नंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.इंदौरहून येताच, वाल्मीक नगरातून केली अटकनराधम पतीचा मित्र रमेश काकडे हा इंदोर येथे बहिणीकडे असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्‍यातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांना मिळाली होती. त्यातच तो वाल्मीकनगरात आला असल्याची माहितीही त्यांना मिळाली. मंगळवारी दुपारी एक वाजता पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रूपेश ठाकूर आदींनी वाल्मीकनगरात सापळा रचून रमेश काकडे याला अटक केली. दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून पीडित महिलेचा पती व रमेश काकडे हे मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बुधवारी काकडे यास न्यायालयात हजर करण्‍यात येणार आहे. 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव