शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गिरणा मायीची एक तपानंतर भरली खणा नारळाने ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 8:02 PM

गिरणा मातेचे ऋण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथे गिरणामातेचा जलपूजन सोहळा थाटात पार पडला.

ठळक मुद्देगिरणाईच्या जलवैभवाला भूमिपुत्रांंचा असाही उपक्रमवाडे गावापासून नदी पात्रापर्यंत मिरवणूक

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : गिरणा नदीला तब्बल १२ वर्षांनंतर पुराचे पाणी आल्याने यंदा गिरणा नदी दुथडी भरुन वाहिली. पाणीटंचाई दूर झाली. नागरिक आनंदाने भारावले. एक तपानंतर गिरणा मायीची खणा नारळाने भरली ओटी. गिरणा मातेचे ऋण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथे गिरणामातेचा जलपूजन सोहळा थाटात पार पडला. जलपूजन ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून गिरणामायला पाच सुवासिनींच्या हस्ते साडी चोळीचा आहेर देऊन ओटी भरण्यात आली.सकाळी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गिरणा नदीच्या पात्रापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गिरणा मायच्या नावाने घोषणा देत परिसर भक्तीच्या निनादाने दणाणला होता. वाडे ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गिरणा धरण भरल्याने वाडे नागरिकांमध्ये आनंदाला उधाणनिसर्गाच्या अवकृपेने गिरणा धरण अनेक वर्षांपासून पाण्याने भरत नव्हते. गिरणा नदीला अनेक वर्षांपासून पुराचे पाणी आले नाही. गिरणा काठी राहणाऱ्यांना दुष्काळासह चटके सहन करावे लागले. मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने चांगली आभाळमाया बरसल्याने गिरणा धरण तब्बल १२ वर्षांनंंतर १०० टक्के भरले. गिरणा नदी यंदा प्रथमच पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहिली. यात काही जीवितहानी वा नुकसान झाले नाही. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. या आनंदाने आज गिरणा काठ सुखावला आहे. वाडे येथील नागरिकांमध्येही आनंदाचे उधाण आले आहे.गिरणामायला साडी चोळीचा आहेर देण्याच्या उपक्रमासाठी उद्यानपंडित राजेंद्र हरी पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रामस्थांच्या मदतीने व लोकवर्गणीतून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमिक विद्यालयातील कलशधारी मुली सहभागी झाल्याने मिरवणुकीत आकर्षण ठरले. यात वारकरी सांप्रदायाचे भाविक, नागरिक, महिला, विद्यालयाच्या मुली आदींंचा मोठ्या संख्येने सहभाग होता.यावेळी स्वाती राजेंद्र पाटील, उषाबाई अशोक परदेशी, मेघा गोपाल परदेशी, सविता हेमराज माळी, साधना मनोज पाटील यांनी सपत्नीक पूजाअर्चा केली. पूजन गोंडगावचे पुजारी उमेश जोशी यांनी केले.

टॅग्स :WaterपाणीBhadgaon भडगाव