शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वकिलाला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:10 IST

मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली.

ठळक मुद्देदादावाडी परिसरातील घटनापोलिसांनी घेतली घटनेची नोंदपोलिसांच्या हस्तक्षेपामुळे टळली मोठी घटना

जळगाव : मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. दरम्यान, या घटनेची तालुका पोलीस स्टेशनच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे.आरक्षणाच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलने सुरु आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. आंदोलन व जलसमाधी या दोन्ही मुद्यावर या वकीलाने सोशल मीडियावर मंगळवारी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही तरुण व महिलांनी मंगळवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान वकीलाचे घर गाठून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे बीट मार्शल हे तातडीने दादावाडीत पोहचले, मात्र प्रकरण गंभीर असल्याने सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व त्यापाठोपाठ पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटविला.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव