शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला प्रकरणात अ‍ॅड.विजय पाटील यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:38 IST

मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’ तील वादातून नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अ‍ॅड.विजय भास्करराव पाटील यांना मंगळवारी दुपारी पांडे चौकातून अटक केली. अचानक झालेल्या अटकेमुळे पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे  मविप्र संस्थेचा वाद  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’ तील वादातून नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अ‍ॅड.विजय भास्करराव पाटील यांना मंगळवारी दुपारी पांडे चौकातून अटक केली. अचानक झालेल्या अटकेमुळे पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.‘मविप्र’ संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन भोईटे व नरेंद्र पाटील गटात १९ जून २०१८ रोजी तुफान हाणामारी झाली होती. दोन्ही गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक झाली. दरम्यान, प्रचंड जमाव झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या वादामुळे परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ३३ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

 १७ जणांना अटकपूर्व मंजूर; एकाचे नाव वगळलेया प्रकरणात पाटील गटाच्या २८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी हेमंतकुमार साळुंखे यांना १४ आॅगस्ट २०१८ रोजी अटक झाली होती. ते सध्या जामीनावर आहेत तर अ‍ॅड.भरत देशमुख यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. १७ जणांनी यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यामुळे अ‍ॅड.विजय पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील, संजय भास्कर पाटील (रा.दीक्षितवाडी) बाळू चव्हाण (रा.कानळदा), अरुण रामचंद्र पाटील व विनोद पंजाबराव देशमुख यांनी अटक झालेली नव्हती. अ‍ॅड.विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन खंडपीठाने फेटाळून लावला आहे. पांडे चौकातून घेतले ताब्यातस्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, सुरेश महाजन, अनिल देशमुख, विनोद पाटील, संजय सपकाळे, सूरज पाटील, प्रमोद लाडवंजारी, महेश पाटील व संदीप साळवे यांच्या पथकाने अ‍ॅड.विजय पाटील यांना पांडे चौकातून ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणले. तेथे पोलीस निरीक्षक बापू रोहोम व जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल यांनी पुढील कार्यवाही केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव