शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ॲड.चव्हाण यांच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:55 IST

मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपीच्या घरात रक्ताने माखलेला चाकू ठेवण्यासाठी कट रचत फसवणुक केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

कुंदन पाटील

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपीच्या घरात रक्ताने माखलेला चाकू ठेवण्यासाठी कट रचत फसवणुक केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने दि.२ मार्च रोजी न्या.आर.वाय.खंडारे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे,खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव येथे विशेष तपास पथकासमोर रविवारी हजर झाले.

नीलेश रणजीत भोईटे (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत साक्षीदार व पुण्यातील व्यावसायिक तेजस मोरे यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांना सहआरोपी करण्यात आले होते. या गुन्ह्यात रविवारी रात्री चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली होती.

सोमवारी न्यायालयाने ॲड.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हा जामिनासाठी अर्ज सादर केल्यावर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी  मात्र, अन्य एका गुन्ह्यात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट होताच जळगाव शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेत रात्री उशीरा अटकेची कारवाई केली होती. म्हणणे सादर करण्यासाठी दि.२ मार्चपर्यंत मुदत मागितली होती. त्यामुळे ॲड.चव्हाण यांचा कारागृहातील मुक्काम वाढला होता. त्यांच्या जामिनावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.