जळगाव : पाणी आणून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शरीफ शेख सद्रोद्दिन (३७,रा.शाहूनगर) याने देविदास धनराज किरंगे (४२) यांना मारहाण केल्याची घटना सुप्रीम पाळणे बुधवारी रात्री नऊ वाजता घडली. सुप्रीम कॉलनीत महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे, शरिफ हा तेथे मजूर आहे तर देविदास त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व सतीश गर्जे यांनी घटनास्थळ गाठून संभाव्य वाद मिटविला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आनंदसिंग पाटील करीत आहे.
पाणी आणून देण्यास नकार दिल्याने प्रौढाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:22 IST