शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देश वाचविण्यासाठी विषमुक्त शेती अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:41 IST

रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देपहूर येथे विषमुक्त शेती कार्यशाळेतून डॉ.जी.एस.गील यांचे आवाहनसरपंच नीता पाटील यांचा विशेष सत्कार

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात विषयुक्त अन्न जात आहे. याला रोखण्यासाठी विषमुक्त शेतीचा मूलमंत्राचा अंगीकार शेतकऱ्यांनी करून देश वाचवावा, असे आवाहन असे कृषीशास्त्रज्ञ डॉ.जी.एस. गील यांनी येथे केले आहे.पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे आयोजित विषमुक्त शेती कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .याआधी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अकोला येथील शेतीतज्ज्ञ शरद इंगळे, आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक संजय पवार, माधुरी गुजराती, चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्याम सावळे, डॉ. सुरेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सरपंच नीता पाटील यांचा सरपंच ‘आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मेणगाव येथील सरपंच सुरेश पाटील यांचाही सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आयोजक संतोष चिंचोले यांनी केले. सूत्रसंचालन शंकर भामरे यांनी केले. आभार राजधर पांढरे यांनी मानले. याप्रसंगी माजी सरपंच प्रदीप लोढा, पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव घोंगडे, अ‍ॅड.संजय पाटील, भिका पाटील, जगन धनगर, प्रा.पी.पी.लहासे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर