खड्ड्यांमध्ये डबके
जळगाव : साने गुरुजी ग्रंथालयाच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गुरुवारी झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणीसाचून मोठ मोठे डबके तयार झाले होते. अनेक वाहनधारकांना यात मोठी कसरत करावी लागली. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता.
चौदा तालुके शंभराच्या खाली
जळगाव : जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये शंभरापेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून केवळ चाळीसगाव तालुक्यात १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजारांच्या खाली आहे. मध्यंतरी ही संख्या ११ हजारांवर पोहोचली होती. भडगावात १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
३६०० चाचण्या
जळगाव : गुरुवारी जिल्हाभरात ॲन्टीजनच्या २०७३ तर आरटीपीसीआरच्या १६७५ चाचण्या झाल्या आहेत. तर आरटीपीसीआरचे १८०० अहवाल समोर आले आहेत. यात ६ बाधित आढळून आले आहेत. ॲन्टीजन चाचण्यांमध्ये २९ बाधित समोर आले आहेत. ६११ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.