शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:02 IST

१०२ मृत्यूनंतर आज आढावा : वाढलेला मृत्यूदर, रुग्णसंख्येमुळे आरोग्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची वेळ

जळगाव : जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरापेक्षा चौपट व जळगाव जिल्हा कोरोना मृत्यूत राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असे चित्र असतानाही या गंभीर बाबीकडे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याचे चित्र असल्याने याची आता थेट आरोग्य मंत्र्यांनीच दखल घेतली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर जळगावात डागडुजी सुरू झाली आहे. आरोग्य मंत्री टोपे हे आढावा घेण्यासाठी ३ जून रोजी जळगाव दौºयावर येत असून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करण्यासह आढावा बैठक घेणार आहे़जिल्ह्यात सोमवारी १३ मृत्यूची नोंद झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा ८ मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या शंभरावर गेली आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या, मृत्यूदर वाढीबाबत विविध क्षेत्रातून ओरड होत असतानाही स्थानिक पातळीवर हव्या त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या़ मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. यात अचानक प्रशासक म्हणून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली़ या सोबतच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस ़चव्हाण यांनी रावेरात जावून आढावा घेतला़ ‘मृत्यूदर व बदलीचा विषय डीनला’च विचारा असे सांगणारे संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी कोविड रुग्णालयात डॉक्टरांची खरडपट्टी करणे, प्रांताधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ अशा घडामोडी एकाच दिवसात घडल्या व डागडुजी सुरू झाली.वाढलेल्या मृत्यूदराची ह्यपीएमओह्णकडून दखल, ५ रोजी केंद्रीय पथक जळगावातजिल्हाभरातील बाधितांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत वेगवेगळ््या राजकीय मंडळींकडून तक्रारी होण्यासह आता खुद्द खासदार उन्मेष पाटील यांनीच पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केली. जळगावातील या प्रकाराची तेथे दखल घेण्यात आली असून ५ जून रोजी जिल्ह्यात केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे. मुंबई पुणे मालेगाव यांच्या तुलनेत जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाकडे आरोग्य प्रशासनाविषयी तक्रार केली आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या मृत्यू आणि त्यांना देण्यात येणाºया आरोग्य सुविधेतील उणिवा विषयी चिंता केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी येत्या ५ जून रोजी प्रशासकीय अधिकारी व जळगावचे जिल्हाधिकारी राहिलेले कुणालकुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. तसा संदेश खासदार पाटील यांना दिला. आरोग्य प्रशासनाची तपासणी करून यंत्रणेचा अहवाल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे देणार आहे़शनिवार ठरला कोरोनावार, एकाच दिवसात ८० रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी एकाच दिवसात तब्बल ८० बाधित रुग्ण जिल्हाभरात आढळून आलेले आहेत़ यात प्रशासनाकडून आधी ५५ रुग्णांची माहिती जाहीर करण्यात आली होती़ नंतर तीन रुग्ण वाढल्याचे समोर आले त्यानंतर ३० मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता २२ रुग्ण आढळून आल्याची माहिती रविवारी जाहीर करण्यात आली़ यासह रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ३८ नवीन रुग्ण तर ८ जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आलेले आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव