शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

आदित्य ठाकरे यांनी जळगाव ग्रामीण मधून निवडणूक लढवावी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:37 IST

गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव : धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, माझ्या सारख्या रस्त्यावरच्या माणसाला या मतदार संघाने तीनवेळा आमदार केले.आता मंत्री झालो. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या या मतदार संघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी व इथून आमदार व्हावे अशी माझी ईच्छा असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडात झाला.मात्र आदित्य ठाकरेंनी मिश्किलपणे हास्य केले.ठाकरे यावेळी म्हणाले की, शेतकरी बांधवानी आता आत्महत्या करण्याची गरज नाही.फक्त शिवसेनेला आवाज द्या तुमच्या अडचणी सोडविण्यास शिवसेना कटीबध्द राहील. सुत्रसंचालन जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघव व माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले. आभार विश्वनाथ पाटील यांनी मानले. याप्रसंगी जळगाव ग्रामीण मतदारसंघा मधील राष्ट्रवादीच्या अनेक सरपंच व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सभेला शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.एरंडोल येथे जल्लोषात स्वागतएरंडोल येथे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’चे राष्ट्रीय महामार्ग चौफुलीवर सायंकाळी ४.५९ वाजता आगमन झाले. यावेळी वाजत गाजत व जयघोष करीत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. कासोदा ते एरंडोल मोटरसायकल रॅलीसह ही यात्रा एरंडोल पर्यंत पोहोचली होती.या वेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वाहनातून बाहेर येवून उपस्थित शिवसैनिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांना हात उंचावून अभिवादन केले. नंतर त्यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, जगदीश पाटील जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, विवेक पाटील, वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर आमले, अतुल महाजन, कृणाल महाजन, दीपक गायकवाड, मोहन सोनावणे आदींनी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी नगराध्यक्षा शोभाताई महाजन व विद्यमान नगरसेविका कल्पना महाजन, सुभाष मराठे हे उपस्थित होते.या वेळी नगरसेविका आरती महाजन व प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्षा मीना चौधरी, नगरसेवक नितीन बिर्ला, परेश बिर्ला, चिंतामण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र ठाकूर, रेवानंद ठाकूर, शरद महाजन, मंगेश जैस्वाल, मयूर बिर्ला यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.ठाकरे हे एरंडोल येथे फक्त ४ मिनिटे थांबले या ४ मिनिटात महाविद्यालयीन विद्यार्थां व युवा शिवसैनिक यांच्या उत्साहाला उधान आले होते.भडगाव येथे ढोल ताशांच्या गजरात स्वागतआदित्य ठाकरे यांचे दुपारी साडेतीन वाजता भडगाव येथील पाचोरा चौफुली येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष ङॉ.वसीमबेग मिर्झा, नगरसेवक राजेंद्र पाटील उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रताप पाटील, माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पाटील, शिवसेना महिला तालुका प्रमुख सीमा पाटील, शिवसेना महीला शहर प्रमुख पुष्पा परदेशी, माजी नगराध्यक्षा करुणा देशमुख, नगरसेविका सुशिला पाटील, संजय पाटील, जालींदर चित्ते, शिवसेना शहर प्रमुख मनोहर चौधरी, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, युवा सेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, शेतकरी सेना तालुका प्रमुख अनिल पाटील, युवा सेनेचे विनोद पाटील, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख रतन परदेशी, कैलास पाटील ,नगरसेवक संजय सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. विलास पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले, युवराज पाटील, ईम्रानअली सैय्यद, शिवसेना माजी तालुका प्रमुख जे. के. पाटील, निलेश पाटील , जगदीश भोई, बंटी सोनार, शाम पाटील, अनिल पाटील ,बबलु पाटील, भाउसाहेब पाटील आदी उपस्थित होते.कासोद्यात वृक्षारोपणकासोदा, ता. एरंडोल येथे दुपारी ४ वाजून ३१ मिनिटांनी भडगावहून आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. वृक्षारोपण करुन लागलीच त्यांचा ताफा ४.३५ वाजता एरंडोलकडे रवाना झाला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाडळसे धरणाचा प्रश्न मार्गी लावणारलोकसभेच्या निवडणुकीच्या यशानंतर राज्यात भगवेमय वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचीच सत्ता येणार. सध्या राज्यातत दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शिवसेना दुष्काळी दौरा करून शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच चोपडा, अमळनेर, शिंदखेडासह पाच तालुक्यांतील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा पाडळसे धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रखडलेल्या धरणाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त चोपडा येथील आझाद चौकातील सायंकाळी झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार संजय राऊत, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख मिलिंद पारकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.