शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस हंडी घरपोच वितरण शुल्क घेतल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:42 IST

तीनही कंपनींनी शुल्क न आकारण्यासंदर्भात घेतला निर्णय

जळगाव : एलपीजी सिलिंडर वितरण करताना घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी केल्यास या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असून तसा निर्णयच गॅस वितरण करणाºया तीनही कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनानेदेखील असे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. या पूर्वी अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्यावतीने २००१, २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाºया कंपन्यांच्या वितरकांसाठी घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते. मात्र त्यानंतर असे शुल्क आकारू नये असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हणणे होते. त्यानुसार कंपनीच्या अधिकाºयांनी पत्र व्यवहारही केले. त्यानंतर असे शुल्क आकारू नये, असा निर्णय कंपन्यांनी घेतला. तसे आदेशही राज्यात सर्व प्रथम जळगाव जिल्हा प्रशासनाने काढले व घरपोच सिलिंडरसाठी शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र यावर गॅस वितरकांनी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल या  तीनही कंपन्यांच्या अधिकाºयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी उपस्थित अधिकाºयांनी वितरकांनी कंपनीची नियमावली समजावून सांगत त्यांना देण्यात येणाºया कमिशनचीही जाणीव करून दिली. देण्यात येणाºया या कमिशनमधूनच सर्व खर्च करायचा असून या पुढे घरपोच शुल्क घेतल्यास जीवनावश्यक कायद्यामधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा ईशारा कंपनीसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशातून देण्यात आला आहे. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी,   कंपनीचे सहायक व्यवस्थापक (विक्री) स्वप्नील श्रीवास्तव, राहुल चव्हाण, पांडुरंग ठाकरे यांच्यासह कंपनीचे विविध अधिकारी, वितरक उपस्थित होेते. घरपोच न दिल्यास २७.५० रुपये द्यावे लागतील परतसध्या गॅस सिलिंडरचा जो दर आहे, तेवढीच रक्कम घरपोच हंडी देताना घ्यावयाची असून त्या पेक्षा जास्त शुल्क तर घेताच येणार नाही व ही हंडी जर ग्राहकाने गोदामातून घेतली अथवा वितरण करणाºयाने घरपोच न देता चौकात उभे राहून ग्राहकाला हंडी दिल्यास ग्राहकाला २७.५० रुपये हंडीच्या मुल्यातून परत द्यावे लागतील, असेही कंपनीचे सहायक व्यवस्थापक (विक्री) स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात हंडीचे दर ६०० रुपये असल्याचेही त्यांनी सांगत वितरकांनी या पेक्षा एक रुपयाही जास्त घेऊ नये, असे निर्देश दिले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव