शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

अतिक्रमित हातगाडीधारकांवर कारवाई

By admin | Updated: February 9, 2017 23:32 IST

चोपडा : प्रमुख चौकांनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांच्या कारवाईमुळे समाधान

चोपडा : शहरात सर्वच  मुख्य रस्ते हातगाडीधारकांनी व्यापले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर चालणेही कठीण झाले आहे. अखेर चोपडा शहर पोलिसांनी  अतिक्रमित हातगाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला.अनेकांचे वजनकाटे जप्त केले. या कारवाईमुळे मुख्य चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. सर्वच रस्ते हातगाडीधारकांनी व्यापल्याने, या रस्त्यांवरून चालणेही कठीण झालेले आहे. अनेकदा वाहनचालक व हातगाडीधारक यांच्यात वाद झालेले आहेत. या वादाचे पर्यवसन हाणामारीतही झालेले आहे. शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र ती जबाबदारी पोलिसांनी पार पाडली. शहरात  पोलिसांनी रस्त्यावर हातगाडय़ा उभ्या करून व्यवसाय करणा:या जवळपास 55 हातगाडी धारकांवर  कारवाईचा बडगा उगारला आहे. या हातगाडीधारकांचे वजन काटे जप्त करून त्यांच्यावर न्यायालायमार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वच हातगाडी धारकांना न्यायालयात पाठवून दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतर हातकाटे परत केले जात आहेत.त्यांच्यावर झाली दंडात्मक कारवाईशिवाजी सारंग दरबारी,रवींद्र धोंडू पाटील,योगेश पांडुरंग चौधरी,हिरामण नथू पाटील,बापू महादेव बारी,टिळक दौलत महाजन,दगडू रतन माळी, संजय जगन्नाथ महाजन,राकेश राजेंद्र माळी, गणेश रमेश चौधरी,निलेश अनिल साळुंखे,विनोद सुभाष महाजन, सुशिलाबाई दिलीप महाजन,स्वप्नील वसंत चौधरी,अजहर पिरन बागवान, रिजवान इकबाल बागवान,सीताराम मायाराम माळी,लक्ष्मण माधव बारी, शेख लाजीम शेख अमिद, किरण रमेश महाजन, अज्जूबखान बिस्मिल्लखान, रोहिदास आधार माळी यांचेसह 55 हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून मात्र रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, स. पो. नि. आर.एन.पवार, कांचन काळे, विजय निकम, निलेश सोनवणे, प्रवीण मांडोळे, प्रकाश मथुरे, संजय पाटील, आर.सी.बी.चे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.    (वार्ताहर) हातगाडी धारकांचे  अतिक्रमण वाढत चालले होते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असतांना हातगाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असतो. म्हणून अतिक्रमण करणा:या हातगाडय़ांवर कारवाई करण्यात आली. रहदारीचे रस्ते मोकळे करण्यात आले.ही मोहीम कायम सुरू ठेवणार आहे.- किसनराव नजनपाटील, पोलीस निरीक्षक, चोपडा