शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

जळगावात मनपाची प्लॅस्टिक विरोधात मोहिम : १९ जणांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:42 IST

फुलमार्केट, गोलाणी मार्केट परिसरात कारवाई

ठळक मुद्देदुकानातून प्लॅस्टिक जप्तीच्या वेळेस गोंधळ आणि धावपळदंडात्मक कारवाई

जळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिवसभर फुले मार्केट व गोलाणी मार्केट परिसरात धडक मोहिम राबवत प्लॅस्टिक वापर आणि विक्री करणाऱ्या १९ दुकानधारकांवर दंडात्मक कारवाई केली़ कारवाईच्या पहिल्याच दिवशी या १९ जणांकडून ९५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ दरम्यान आरोग्य विभागातर्फे प्लॅस्टिक विक्री व वापर न करण्याबाबत बाबत दुकानधारक व नागरिकांना सूचना देखील केल्या. मंगळवारपासून ही कारवाई अधिक कडक करण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी सांगितले़महाराष्ट्र शासनाने विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात २३ जूनपासून प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे़ त्यानुसार सोमवारपासून आरोग्य विभागातर्फे धडक मोहिम राबविण्यात आली़ त्याच्या नियोजनासाठी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात बैठक पार पडली़ यावेळी आरोग्य अधिकारी, आरोग्य अधीक्षक तसेच अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़डांगे यांनी कारवाई करण्याच्या सुचना केल्या़ आज समज देण्यात यावी, परंतू, अधिक प्रमाणात प्लॅस्टिक आढळ्यास कारवाई करावी अशा सुचना त्यांनी केल्या़ त्यानंतर पाच हजार रूपये दंड आकारावे, पुन्हा आढळ्यास दहा त्यानंतर पंचवीस हजार तर चौथ्या वेळेस विक्री व वापर करताना आढळुन आल्यास संबंधिताविरूध्द न्यायालयात केस दाखल करण्याच्या सुचना केल्या़ अन् कारवाई करण्याचे निर्देश दिले़ त्यानुसार तीस-तीस कर्मचाºयांचे दोन पथक तयार करण्यात आले़दुकानातून प्लॅस्टिक जप्तीच्या वेळेस गोंधळ आणि धावपळआरोग्य अधिकारी उदय पाटील, आरोग्य अधीक्षक ए़ऩनेमाडे, अतिक्रमण अधिकारी एच़एमख़ान, हरिष सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, रमेश कांबळे यांच्या पथकाने सकाळी ११ वाजता फुले मार्केटमध्ये धडक दिली़ पथकाकडून फुलेमार्केटमधील दुकानांची पाहणी करण्यात येऊन दुकानधारकांना प्लॅस्टिक न वापरण्याबाबत सुचना करण्यात आल्या़ मार्केटमध्ये पथक कारवाईसाठी आले असल्यामुळे सर्वत्र गोंधळ व धावपळ उडाली़मनोज मतानी ट्रेडर्स या दुकानात पथकाने धडक देऊन पाहणी केली असता सर्वाधिक प्लॅस्टिक या दुकानातून जप्त करण्यात आला़ बेसमेंटमध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या वाट्या, पत्रावळी तसेच पिशव्या जप्त करण्यात आल्या़ अन् दुकानमालकावर जागेवर पाच हजार रूपयांची दंडाची कारवाई करण्यात आली़ त्यानंतर सरस्वती ट्रेडींग कंपनी व एसक़े़प्लॅस्टिक या दुकानांची झडती घेऊन प्लॅस्टिक जप्त केले़ त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली़

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव