शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

एचआयव्हीग्रस्त रुग्णांना पूरक औषधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:54 IST

रुग्णांची तक्रार

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणाऱ्या काही औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात मात्र एआरटी सेंटरच्यावतीने इन्कार करण्यात आला असून आवश्यक ती सर्व औषधी रुग्णांना नियमित दिली जात असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये औषधोपचार केले जातात. यामध्ये काही रुग्णांना झिडोकडाईन लॅमकोडाईन अर्थात झेड.एल., टीएलई व इथर पूरक औषधी दिली जाते. एकदा औषधी सुरू झाली की ती शेवटपर्यंत कायम व विनाखंडित द्यावी लागते. अन्यथा विषाणूंची संख्या वाढत जाते व रुग्णांचा जीव धोक्यात येतो. असे असले तरी काही पूरक औषधीचा तुटवडा भासून ती मिळत नसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. तसेच बाहेर ही औषधी महाग येते. ती घेण्याची अनेकांची आर्थिक स्थिती नसलते. त्यामुळे या सेंटरमधून नियमित औषधी मिळावी, अशी रुग्णांची मागणी आहे.या बाबत एआरटी सेंटरकडून इन्कार करण्यात येऊन सांगण्यात आले की, एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जात आहे. काही पूरक औषधी असती ती रुग्णांची संख्या पाहून उपलब्ध करून दिली जाते. औषधी दिली जात नाही, असे होत नाही, असेही या सेंटरच्यावतीने सांगण्यात आले. जळगावातील सेंटरवर ही पूरक औषधी नसल्यास ती नाशिक अथवा इथर सेंटरवरून मागविली जाते. अशाच प्रकारे राज्यातील प्रत्येक सेंटरची स्थिती असल्याची माहिती मिळाली.उपचार सुरू कराजिल्ह्यामध्ये १४ हजार एच.आय.व्ही. रुग्णांची नोद आहे. यापैकी १० हजार उपचार घेणारे रुग्ण आहेत. उपचार सुरू न केलेल्या रुग्णांनीही एआरटी सेंटरशी संपर्क साधून उपचार सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राकडूनच औषधीचा पुरवठा कमी केंद्र सरकारकडून राज्याला व मुंबई येथून जिल्हा रुग्णालयाला या औषधींचा पुरवठा केला जातो. यामध्ये केंद्राकडूनच औषधीचा पुरवठा कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे रुग्णांना एकसोबत पूरक औषधी न देता थोडी-थोडी दिली जात होती. मात्र ती नियमित सुरू होती, असे सेंटरच्यावतीने सांगण्यात आले.आवश्यक सर्व औषधी उपलब्ध असून त्या सोबत दिली जाणारी पूरक औषधी मिळत नाही, असे कधीच होत नाही. रुग्णांच्या मागणीनुसार रुग्णांना पूरक औषधी उपलब्ध करून दिली जाते.- संजय पहूरकर, कार्यक्रम अधिकारी, एआरटीसेंटर.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव