शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आजोळातील संस्काराच्या शिदोरीने गाठला यशाचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 20:41 IST

अनिता दाते - केळकर

ठळक मुद्देकोणत्याही प्रसंगाने खचून न जाता प्रयत्न करीत राहण्याचा दिला महिलांना सल्लाकितीही ऊन असले तरी जळगावात यायचेच

जळगाव : जळगाव शहराशी माझे बालपणापासून ऋणानूबंध असून आजोळ असलेल्या या शहरातूनच मला संस्कार मिळत गेले व या शिदोरीच्या जोरावरच जीवनात यशस्वी झाल्याचे स्पष्ट मत नाट्य अभिनेत्री अनिता दाते - केळकर यांनी प्रकट मुलाखतीद्वारे व्यक्त केले.केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सवाचे आयोजन रविवारी आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी अनिता दाते -केळकर यांची अपर्णा महाशब्दे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी बोलताना जळगावविषयीच्या आठवणींना उजाळा देत नाट्यक्षेत्रातील प्रवासाचे वर्णन केले. सोबतच त्यांनी महिलांना व तरुणींना यशाचे मंत्रही दिले.कथ्थक पाठोपाठ आवडीने नाट्यक्षेत्राकडे वळलेआपल्या नाट्य क्षेत्रातील पदार्पणाबाबत बोलताना अनिता म्हणाल्या की, मला लहानपणापासून कथ्थक शिकत होते. त्यानंतर वडील नाट्यक्षेत्रात असले तरी त्यांनी कधी माझ्याबाबत शिफारस केली नाही. मात्र मला आवड असल्याने मी इकडे वळले व यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.सर्व कलांचा संगम म्हणजे नाट्यकलाआपल्या मुलांना काही येत नाही म्हणून त्यांना नाटकात पाठवू नका, तर त्यांना सर्वच क्षेत्रात प्रावीण्य असेल तरच त्यांना नाट्यक्षेत्रात पाठवा. कारण नाट्य क्षेत्र हे सर्व कलांचा संगम असून यात यशासाठी सर्वक्षेत्राचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी रामायण, महाभारत या मालिकांसह त्यांच्या राधिका या भूमिकेविषयीदेखील काही उदाहरणे दिली.समाजाचे देणे लागतोसमाज आहे म्हणून आपण आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक जबाबदारीचाही संदेश दिला. आपण पाणी फाउंडेशनसाठी काम करीत असून सर्वांनी सामाजिक बांधीलकी जपत आपल्या आवकमधून समाजासाठीही काही देणे द्यावे, असे आवाहन केले.गरजूंना मदत करात्यांना देण्यात आलेली भेट त्यांनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला मदत म्हणून मृदुला कुलकर्णी यांच्याकडे मदत सुपूर्द केली. सेवालयाच्या कामाने आपण भारावून गेलो होतो. यापुढेही मदतीसाठी आपला प्रयत्न राहणार असून इतरांनीही गरजूंना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.मुलाखतीदरम्यान त्यांनी राधिका या पात्राविषयीदेखील मननोकळ््या गप्पा मारत मला शनयाचे पात्र अधिक आवडले होते, असे सांगितले.कितीही ऊन असले तरी जळगावात यायचेचजळगावातील ऊन सर्वच माहित असल्याने या मुलाखतीदरम्यान अनिता दाते यांनीही त्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, लहानपणापासून मी जळगावात मामाकडे येत असे. येथे कितीही ऊन असले तरी मी न चुकता जळगावात यायची, असे सांगून त्या म्हणाल्या की, या सुट्टीच्या काळात मी मामे बहीण व इतर बच्चे कंपनीसोबत मनसोक्त खेळायचे. येथील विविध खेळ व भुलाबाईच्या पारंपारिक खेळांचाही उल्लेख त्यांनी या वेळी केला.अभ्यासू वृत्ती, सकारात्मक वृत्तीने यशकोणत्याही महिलेच्या जीवनात कधी कठीण प्रसंग येऊ नये, मात्र जीवनात कोणताही प्रसंग आला तरी खचून न जाता प्रत्येक महिलेने त्या प्रसंगास तोंड द्यावे व स्वत: उमीदेने उभे राहत यश मिळवावे, असे आवाहन केले. तसेच तरुणींना संदेश देताना अनिता दाते म्हणाल्या की, कोणत्याही बाबतीत अभ्यासू वृत्ती ठेवा, सकारात्मक विचार करा, चांगल्या लोकांसोबत रहा, तुम्हाला हमखास यश मिळेल, असा सल्ला अनिता दाते यांनी दिला.

टॅग्स :Jalgaonजळगाव