शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

फेसुबकवर धमकी पोस्ट प्रकरणी फिर्यादीच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:33 IST

आत्मघाती हल्ल्याची दिली होती धमकी

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला देशातील प्रमुख पाच मोठ्या शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकीची पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती. या प्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाला असून अमान इरफान अन्सारी (रा.फातीमा नगर, जळगाव) याला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, जामीनपात्र गुन्हा असल्याने त्याला ताब्यात घेवून नोटीस देवून सोडून देण्यात आले आहे.जिल्हा पोलीस दलाने फेसबुक तसेच मोबाईल कंपन्यांची मदत घेवून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.रिजार्च व्यवसाय भागीदार असतानाही मोहम्मद कलीमोद्दीन ने विश्वासघात करुन १७ लाखांत केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी व पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करावी म्हणून, फियार्दीनेच मोहम्मदचे फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यावरुन धमकीची पोस्ट टाकण्याची शक्कल लढविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे पोलीस दलात मोठीच खळबळ उडाली होती.जळगाव जिल्हा हा सिमी संघटनेशी संबंधित असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी हा गुन्हा अतिशय गांभीर्याने घेतला होता. त्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्याकडे सोपविण्यात आला होता. डॉ. निलाभ रोहन यांनी पोस्ट अपलोड करणाºयाचा शोध घेण्यासाठी फेसबुक कंपनीला पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार फेसबुक कंपनीने दोन दिवसात पोस्ट टाकल्याबाबत आयपी अ‍ॅड्रेस शोधला. या अ‍ॅड्रेसनुसार कोणत्या ठिकाणचे इंटरनेट वापरले, त्याबाबत खोलात तपास केल्यावर मेहरुण परिसरातील एका ठिकाणाच्या वायफायचा मोबाईलवरुन पोस्ट टाकण्यासाठी वापर केल्याचे समोर आले.बदला घेण्यासाठी पोस्ट अपलोड केली अन् स्वत:चा अडकलासमीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन व इरशाद बी समीर शेख (दोघे रा. इंदूर) यांच्यासोबत आपण रिजार्चचा व्यवसाय केला. काही दिवसांनी त्यांनी विश्वासघात करुन माझ्यासह एकाला एकूण १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयांत गंडा घालून दोघे फरार झाले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात १० जानेवारी २०१९ रोजी गुन्हा दाखल आहे. त्यांना पोलिसांनी अटक करावी, व माझी केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी धमकीची पोस्ट तयार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.तांत्रिक पुरावे ठरले दुवेधमकीची पोस्ट टाकण्यासाठी ज्या आयपी अ‍ॅड्रेस निष्पन्न झाला. मात्र कोणत्या मोबाईल क्रमाकांवरुन वायफाय वापरुन ही पोस्ट टाकण्यात आली, त्यासाठी पोलीस विभागातर्फे भारत दूर संचार विभाग व दुसºया एका कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. कंपन्यांनी आयपी अ‍ॅड्रेसवरुन मोबाईल क्रमांक शोधून काढले. मोबाईल क्रमांक हा मुस्ताक अन्सारी नामक व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्यांनी मोबाईल नंबर माझ्या नावावर आहे, मात्र त्याचा वापर पुतण्या अमान इरफान अन्सारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.अमान अन्सारीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने फेसबुकवरुन धमकीची पोस्ट टाकल्याची कबुली दिली.आम्हाला पकडून दाखवा आणि सर्वनाश स्वत: पहा...२२ मे रोजी फेसबुकवरील अतिया रिचार्ज या अकाउंटवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा असून, पोस्टमध्ये संशयिताने स्वत:चे नाव मोहम्मद कलीमद्दीन खान दिले होते. तसेच तो स्वत:ला ‘जैश ए मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा सदस्य म्हणवून घेत होता. पाच मोठ्या शहरांसह पंतप्रधान कार्यालय किंवा अन्यत्र कुठे काहीही होऊ शकते, अशी धमकी देत सरकारने आम्हाला पकडून दाखवावे, अन्यथा सर्वनाश स्वत:च्या डोळ्यांना पाहावा, असेही पोस्टमध्ये म्हटले होते. या पोस्टमुळे गुप्तचर यंत्रणा कामाला लागली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव