शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बसची शिवशाहीला धडक, 1 ठार 25 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:32 IST

एका लक्झरी बसने शिवशाही बसला जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला असून २५ जखमी झाले आहेत. अपघातानंतर लक्झरीचा चालक फरार आहे.

ठळक मुद्देपारोळा कुटीरला वैद्यकीय अधिकारी नसल्याने १०८ चे डॉ.सुनील पारोचे, डॉ.धनंजय पाटील, डॉ.राहुल जैन, डॉ.योगेश साळुंखे, परिचारिका चारुशीला संघपाल, दीपक सोनार, प्रमोद सूर्यवंशी, रोशन पाटील, ईश्वर ठाकूर, राजू वानखेडे व खासगी डॉक्टरांनी उपचार केले हे विशेष.जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा ह्या त्यांच्या रक्तपेढीच्या जीपमध्ये जळगाववरून धुळ्याकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी रस्त्यावर अपघातस्थळी थांबून चार गंभीर जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून माणुसकी दाखविली.रुग्णालयात मलकापूरचे उद्योजक तिलकचंद नरसिदंड, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, एरंडोलचे नरेंद्र राजपूत, दिलीप भाई मेथाजी, टिलेश भाटे, संजय पाखले, नितीन भोपळे, प्रमोद कासार, कमलेश लुणावत, जगदीश गुजराथी आदींनी भेट देऊन जखमींना मदत केली.

पारोळा, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील तुराटखेडा गावानजीक पारोळ्याहून जळगावकडे जाणारी महामंडळाची शिवशाही बस व अकोल्याहून सुरतला लग्नासाठी जाणारी लक्झरी बस यांच्यात सामोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनातील सुमारे २५ जण जखमी झाले असून, योगेश कांतीलाल शाह (वय ४५, रा.अकोला) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे सहाला घडली. जखमींपैकी १० जण गंभीर आहेत.सूत्रांनुसार, अकोला येथून शाह कुटुंब हे गजानन लक्झरी (क्रमांक एमएच-३०-एए-७५६४)ने सुरत येथे लग्न समारंभासाठी जात होते. याच वेळी पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी महामंडळाची शिवशाही वातानुकूलित बस (क्रमांक एमएच-१८-बीजी-१५८५) यांच्यात सकाळी सहाला भीषण अपघात झाला. या अपघातात शाह कुटुंबातील नीलेश मांडविया, हितेश ईश्वर शाह, साकरचंद प्रेमचंद शाह, ईश्वर साकरचंद शाह, शशीभाई शाह, भारत ईश्वर शाह, मिटाबेन ईश्वर शाह, निटाबेन शाह, एकता मोंटू शाह, जयंतीबेन शाह, काजल हितेश शाह, दिनल शाह, ध्रुवी शाह, पार्थ भरत शाह, जयमन योगेश शाह, चार्मी योगेश शाह, बिना योगेश शाह हे गंभीर जखमी, तर इतर आठ जण किरकोळ जखमी झाले. तसेच शिवशाही बसमधील १० जण गंभीर जखमी रुग्णांना एरंडोल येथे घटनास्थळावरून हलविले. सर्व जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.या अपघातानंतर शाह परिवाराच्या नातेवाईकांनी कुटीर रुग्णालयात गर्दी करून एकच आक्रोश केला.यातील मयत योगेश शाह हे अकोला जनता बँकेचे चेअरमन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले तर त्यांची पत्नी बिना शाह व मुलगा जयमन, मुलगी चार्मी हे आक्रोश करीत मेरे पती कहां है, मेरे पापा कहां है, असे ओरडत होते, परंतु त्यांचा कुटुंबप्रमुख या अपघातात मयत झाल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. शाह कुटुंब हे सुरत येथे रविवारी भाऊबंदकीत लग्न असल्याने रात्री अकोला येथून हे निघाले होते. त्यांच्यावर क्रूर काळाने पारोळ्याजवळ घाला घातला. या अपघातामुळे शाह कुटुंब हे फारच भेदरलेल्या अवस्थेत होते.पहाटे अपघात होताच तुराटखेडा, मराठखेडा, सावखेडा होळ येथील तरुण मंडळींनी मदत करीत एरंडोल, पारोळा, कासोदा, बहादरपूर येथील १०८ रुग्णवाहिकांना बोलवले. बसेसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेत रुग्णांना एरंडोल, पारोळा येथे हलविले. 

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा